News18 Lokmat

Happy Birthday Sachin : एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार अन् अब्दुल कादिरला भरली धडकी

पाकिस्तानचे माजी लेग स्पिनर कादिरला सचिनला पाहून अजूनही भरते धडकी

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 07:02 AM IST

Happy Birthday Sachin : एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार अन् अब्दुल कादिरला भरली धडकी

मुंबई, 24 एप्रिल : असं म्हणतात की, सचिन क्रिझवर असला की, प्रतिस्पर्धी आधीच आपली अस्त्र तयार ठेवायची. पण त्यानंतर सचिन जो त्यांच्यावर बरसायचा, त्यानंतर सचिन म्हणे त्यांच्या स्वप्नात यायचा. असाच एक किस्सा घडला होता, पाकिस्तानचे माजी क्रिकेटर अब्दुल कादिर आणि सचिन यांच्यात.

सचिनने १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्येच पाकिस्तानविरुद्ध त्यांनी पहिली कसोटी मालिका खेळली. पेशावरमध्ये खेळण्यात आलेल्या ३० ओव्हरच्या प्रदर्शनी सामन्यात अब्दुल कादिर यांनी सचिनला धावा करण्यासाठी प्रवृत्त केले. मग काय सचिनने कादिर यांच्या एकाच ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. हा किस्सा तर साऱ्यांनाच माहित आहे. पण मुळात मैदानात काय झाले याचा खुलासा खुद्द कादिर यांनीच केला.

पाकिस्तानचे माजी लेग स्पिनर कादिर म्हणाला होता की, ‘मी सचिनला कराचीमध्ये कसोटी सामना खेळताना पाहिले होते. तेव्हा वकार यूनिसच्या बॉलला तो फ्रंटफुटवर येऊन मारत होता. तेव्हापासून मी त्याचा चाहता झालो. जेव्हा आम्ही पेशावरला खेळायला उतरलो, तेव्हा श्रीकांतने माझ्या ओव्हरवर एकही धाव घेतली नाही. नॉन स्ट्राइकवर सचिन उभा होता.’ ‘ओव्हर संपल्यावर मी सचिनकडे गेलो आणि त्याला म्हणालो की, हा काही आंतरराष्ट्रीय सामना नाही. तू मला पुढील सामन्यात षटकार मारण्याचा प्रयत्न कर. यामुळे तुझंही नाव होईल.’ कादिर पुढे म्हणाले की, त्यावेळी सचिन काहीच बोलला नाही आणि पुढच्या ओव्हरमध्ये तो फलंदाजी करायला उभा राहिला.

यानंतर सचिनने कादिर यांच्या ओव्हरवर तीन षटकार लगावले. यानंतर मुश्ताक अहमदच्या एका ओव्हरमध्ये सचिनने चार षटकार लगावले. ‘मी सर्वशक्ती लावून सचिनला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण हे त्याचं कौशल्य होतं की त्याने मला षटकार लगावले.’


Loading...

VIDEO : राज ठाकरेंकडून भाजपच्या आयटी सेलची पोलखोल, स्टेजवर बोलवलं 'त्या' कुटुंबाला!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 07:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...