Happy Birthday Sachin : सेहवाग म्हणतो...सचिनचं वय म्हणजे जणू स्कोअरकार्ड

Happy Birthday Sachin : सेहवाग म्हणतो...सचिनचं वय म्हणजे जणू स्कोअरकार्ड

46 हा केवळ आकडा नसून त्यात मला चौकार आणि षटकार असा धावफलक दिसतो.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : क्रिकेट चाहत्यांचा देव, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या नावातच जणु क्रिकेट आहे. आपल्या आयुष्याची तब्बल 24 वर्ष सचिननं क्रिकेटला आणि भारताला बहाल केली. आणि 2013ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

मात्र, सचिनची खेळी आजही कट्ट्यांवर चर्चेचा विषय आहे. आजही एखादा नवखा खेळाडू खेळला की त्याची तुलना सचिनशी केली जाते. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत क्रिकेटला एक नवं स्थान सचिनं मिळवून दिलं. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पण त्याला खास शुभेच्छा दिल्या, त्या त्याच्या खास सहकाऱ्यांनं. ज्यानं सचिनसोबत अनेक पार्टनरशिप केल्या. असा त्याचा पार्टनर म्हणजे वीरेंद्र सेहवाग.

सचिनच्या 46वा वाढदिवसाकरिता सेहवागनं त्यांचे फोटो टाकत मजेशीर कॅप्शनही दिलं. सेहवागच्या मते 46 जरी, सचिनचं वय असलं, तरी सेहवाग मात्र तो स्कोरकार्ड आहे. सेहवागनं ट्विट करत 46 हा केवळ आकडा नसून त्यात मला चौकार आणि षटकार असा धावफलक दिसतो.

मास्टरसोबत खेळून माझी कारकीर्द बहरली, असंही त्यानं म्हटलं आहे. तसेच सचिनमुळं गेली 46 वर्ष पृथ्वी पावन होत आहे. सचिन पाजी, तुझे आयुष्य विविध प्रकारे अजून बहरत राहो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’, असे सेहवागने लिहिलं आहे.

VIDEO : जेव्हा नरेंद्र मोदी भेटतात पुणेकर रिक्षाचालकाला...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading