News18 Lokmat

Happy Birthday Sachin : ...जेव्हा सचिनच्या गोलंदाजीनं फलंदाजांची उडते दांडी

1993 मध्ये दक्षिण आफ्रिका तर 1997 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सचिनने ही अफलातून कामगिरी बजावलीय.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 06:59 AM IST

Happy Birthday Sachin : ...जेव्हा सचिनच्या गोलंदाजीनं फलंदाजांची उडते दांडी

मुंबई, 24 एप्रिल : सचिनच्या फलंदाजीबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. सचिनंन आपल्या फलंदाजीनं कोणता विक्रम मोडला नाही असं नाही. त्यानं एवदिवसीय सामन्यात चक्क 200 धावा करण्याचा पराक्रमही केला. पण सचिन म्हटंल की त्याच्या चाहत्यांना आठवते ती, कधीतरी दिसणारी त्याची गोलंदाजी.

सचिननं आपल्या करिअरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर केवळ आपल्या फिरकीच्या जोरावर दिग्गज फलंदाजांनाही पळता भुई थोडी केलीय.

सचिन हा एकमेव असा गोलंदाज असेल जो तीन प्रकारच्या गोलंदाजी करतो. म्हणजे सचिन जलद गोलंदाजी, ऑफ स्पिन आणि लेग स्पिन करण्यातही माहीर आहे. त्यामुळं फलंदाजाल पत्ताच लागत नाही, की नेमका सचिनचा चेंडू कुठे आणि कसा पडेल.

दरम्यान, एकदिवसीय सामन्यातील अखेरच्या षटकात सहा किंवा त्यापेक्षा कमी धावा वाचवणे म्हणजे आव्हानात्मक गोष्ट. अशा वेळी अनेक हुकमी गोलंदाजांचीही दमछाक होते. मात्र मास्टर ब्लास्टरनं ही दोनदा ही किमया केली आहे.

1993 मध्ये दक्षिण आफ्रिका तर 1997 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सचिनने ही अफलातून कामगिरी बजावलीय. योगायोग म्हणजे दोन्हीही वेळी सचिन सामन्यातील पहिल्यांदाच गोलंदाजी करत होता. सचिनच्या गोलंदाजीतील कामगिरीत सातत्य नसले तरीही त्याने अनेकदा मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले आहे.

Loading...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारणाऱ्या सचिनने बळींचेही व्दिशतक पूर्ण केलंय. त्याने कसोटीत 46,एकदिवसीय सामन्यांत 154 तर ट्वेंटी-20 मध्ये 1 बळी अशी कामगिरी सचिनच्या नावावर आहे.


VIDEO : राज ठाकरेंकडून भाजपच्या आयटी सेलची पोलखोल, स्टेजवर बोलवलं 'त्या' कुटुंबाला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 06:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...