सचिन म्हणाला, विराटनं माझा 100 शतकांचा मोडला तर...

सचिन म्हणाला, विराटनं माझा 100 शतकांचा मोडला तर...

भारताचा विराट कोहलीची आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 67 शतकं झाली आहेत.

  • Share this:

त्रिनिदाद, 13 ऑगस्ट : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेली केली. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं 42 वं शतक आहे. वर्ल्ड कपवेळी त्याला एकही शतक करता आलं नव्हतं. एका शतकासाठी त्याला तब्बल 11 सामने वाट बघावी लागली. या शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटची 67 शतकं झाली आहेत. विराटच्या डोळ्यासमोर आता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा विक्रम आहे.

विराटच्या 42 व्या एकदिवसीय शतकानंतर सचिनने प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणाला की, जर विराट कोहलीनं माझ्या 100 शतकांचा विक्रम मोडला तर मी त्याच्यासोबत शँपेन शेअर करेन. सचिनलासुद्धा त्याच्या 100 शतकांचा विक्रम कोण मोडणार याची उत्सुकता आहे.

त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात विराटनं 42 वं शतक झळकावताच सचिनचा एक विश्वविक्रम मोडला. कोहलीचं वेस्ट इंडिजविरुद्ध 8 वं शतक आहे. त्यानं श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध 8 पेक्षा जास्त शतकं केली आहेत. तो पहिलाच असा खेळाडू आहे ज्यानं तीन देशांविरुद्ध 8 पेक्षा जास्त शतकं केली. सचिननं ऑस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता आठव्या क्रमांकावर आहे. त्यानं 11 हजार 363 धावा करणाऱ्या सौरव गांगुलीला मागे टाकले. कोहलीनं 238 सामन्यात 59.71च्या सरासरीनं 11 हजार 406 धावा केल्या आहेत. तर, सगळ्यात जास्त धावा करण्याता विक्रमही अजूनही सचिनच्या नावावर आहे. सचिननं 463 सामन्यात 18 हजार 426 धावा केल्या होत्या.

सगळ्यात जास्त शतक लगावणारा कर्णधार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या तरी संघाविरोधात सर्वात जास्त शतक करण्याती कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना 6 शतक लगावण्याती कामगिरी केली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त 5 शतक लगावले होते.

2000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड

शतकी पारी करत विराटनं 34 डावांत वेस्ट इंडिज विरोधात 2 हजार धावा पूर्ण केल्या. हा एक अनोखा रेकॉर्ड आहे. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार धावा करणारा खेळाडू झाला आहे. याआधी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरोधात 37 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं त्यानं रोहितला मागे टाकले.

SPECIAL REPORT : इथं पोहचणं म्हणजे होतं मृत्यूला आव्हान देण्यासारखे, या गावात कशी पोहोचली NDRF?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 08:23 AM IST

ताज्या बातम्या