News18 Lokmat

टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीच्या बातम्यांमुळे 'त्रिमुर्ती' नाराज

सचिन तेंडुलकर ,सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने नाराजी व्यक्त केलीय. ही नाराजी त्यांनी सीओए चीफ विनोद राय यांना पत्र लिहून कळवली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 08:30 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीच्या बातम्यांमुळे 'त्रिमुर्ती' नाराज

14जुलै: झहीर खान आणि राहुल द्रविड या सहाय्यक कोचेसला रवी शास्त्रीवर थोपल्याच्या अफवेमुळे क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीच्या तिन्ही सदस्यांनी अर्थात सचिन तेंडुलकर ,सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने नाराजी व्यक्त केलीय. ही नाराजी त्यांनी सीओए चीफ विनोद राय यांना पत्र लिहून कळवली.

प्रशासकीय समितीने या तिघांना अशी वागणूक दिली की, जणू काही फक्त हेड कोचचीच नियुक्ती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि आपल्या मर्यादेबाहेर जाऊन त्यांनी सहाय्यक कोचेसची नियुक्ती केलीय.

या पत्रात तिघांनी असं म्हटलंय की, 'झहीर आणि द्रविडची नियुक्ती करण्याआधी त्यांनी रवी शास्त्रीला यांची नियुक्ती करण्याबाबत विचारलं होतं. या दोघांची नियुक्ती करण्यास शास्त्रींनी संमतीही दिली होती'. तसंच पत्राच्या सुरूवातीला ते असं म्हणतात,'असे संकेत मिळत आहेत की आपल्या मर्यादेबाहेर जाऊन आम्ही झहीर आणि राहुल द्रविडची नियुक्ती केलीय. बैठकीत काय ठरलं याची माहितीही आम्ही लगेच राहुल जौहरी आणि अमिताभ चौधरी यांना दिली होती'.

तसंच या प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट कोच निवडण्यासाठी आम्ही जास्तीजास्त प्रयत्न केल्याचही त्यांनी म्हटलंय. पण असं असूनही मीडियातून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेमुळे आणि त्यांची बाजू चुकीच्या पद्धतीने मीडियासमोर मांडल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 08:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...