मुंबई, 29 नोव्हेंबर : भारताचा महान क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचीन तेंडुलकर सतत चर्चेत असतो. एवढंच नाही तर त्याची लेक सारा तेंडुलकरही कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तिचं नवं फोटोशूट असो किंवा रिलेशनशीपच्या चर्चा ती कायम प्रकाश झोतात असते. अशातच सारा पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे केंद्रस्थानी आली आहे. यावेळी तिच्यासोबत दिसलेल्या मिस्ट्री बॉयची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर साराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
साराचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंध्ये सारा एका पार्टीमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. सारासोबत फोटोमध्ये एक मिस्ट्री बॉयदेखील दिसत आहे. त्यामुळे सारासोबत असलेला तो मिस्ट्री बॉय कोण? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या मिस्ट्री बॉयविषयी चर्चा होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तो बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबतही पार्टीमध्ये स्पॉट असतो.
हेही वाचा - South Actress: लग्नानंतर 'ही' साऊथ सुंदरी सिनेसृष्टीला करणार अलविदा?
साराच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसत असणारा हा मुलगी दुसरा तिसरा कोणी नसून 'ओहराम अवत्रमणी' आहे. तो ओरी या नावाने प्रसिद्ध आहे. ओरी फक्त साराच नाही तर बॉलिवूड स्टार किड्ससोबतही अनेक पार्ट्यांमध्ये दिसतो. एवढंच नाही तर त्याचे नाव अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतही जोडलं गेलं आहे.
दरम्यान, सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. साराचे शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. सारा सध्या लंडमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. साराला मॉडेलिंगचीही आवड आहे. तिने ब्रॅड्ससाठी शूट केले आहे. त्यामुळे ती लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. मात्र तिने याविषयी काहीही सांगितलेलं नाहीये.
सारा तेंडुलकरचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबतही अनेकदा जोडलं गेलंय. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळाल्या. मात्र दोघे चांगले मित्र असल्याचं त्यांनी सांगितलंय. शुभमनचं नाव जेव्हापासून बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं गेलं तेव्हा सारा तेंडुलकरसोबत त्याने ब्रेकअप केल्याच्या चर्चा पहायला मिळाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sachin tendulkar