मतदानानंतर सचिनने शेअर केलेल्या फोटोत सारा का नाही?

मतदानानंतर सचिनने शेअर केलेल्या फोटोत सारा का नाही?

भारतरत्न सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. मात्र सारा मतदानासाठी न आल्यानं चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. राज्यात 60.46 टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीवर पावसाचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सर्वसामन्यांसोबत सेलिब्रिटींनीदेखील घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सिनेसृष्टीतील कलाकारांसह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीदेखील मतदान केले. भारतरत्न सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांच्यासोबत मतदान केले. त्यानंतर सर्वांनी मतदान करावं असं आवाहनही केलं.

सचिन तेंडुलकरने वाद्र्यांतील केंद्रात मतदान केलं. मतदानानंतर सचिनने सोशल मीडियावरून पोस्ट केली आहे. यामध्ये मतदानाची शाई बोटाला लावलेलं दाखवत असलेला फोटोही पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये सचिनने म्हटलं की, मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा.

सचिनने मतदानाचं आवाहन केलं पण त्याच्यासोबत मुलगी सारा का आली नाही असा प्रश्न अनेकांनी विचारला. लोकसभेला सचिनने पत्नी आणि दोन्ही मुलांसह मतदान केलं होतं. पण यावेळी सारा परदेशात असल्यानं ती मतदानासाठी येऊ शकली नाही.

सारा सध्या लंडनमध्ये आहे. युनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे. यामुळे तिला यावेळी मतदान करता आलं नाही. सारा आणि अर्जुनने लोकसभेला मतदान केलं होतं. दोघांचेही ते पहिलेच मतदान होते. त्यावेळी सचिनने फोटो शेअर करून मतदानाचे आवाहन केले होते.

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या