स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकांची लूट; गोव्याच्या सबितानं जिंकलं सुवर्ण

स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकांची लूट; गोव्याच्या सबितानं जिंकलं सुवर्ण

दिव्यांग असूनही या खेळाडूने जिंकले एकेरीत सुवर्ण तर, दुहेरीत रौप्य.

  • Share this:

अबुदाबी, 19 मार्च : सध्या अबुधाबी येथे सुरु असलेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये गोव्याच्या सबिता यादवने बाजी मारली आहे. विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस या प्रकारात सबिताने सुवर्णपदक पटकावले आहे. एवढचं नाही तर, सबिताने दुहेरीत रौप्य पदक जिंकत भारताचा झेंडा अटकेपार रोवला.17 वर्षीय सबिता दिव्यांग असून, तिला व्यवस्थित बोलताही येत नाही. काही वर्षांपूर्वी सबिताच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आई घरकाम करत असल्याने लहान वयातच सबितावर घरची जबाबदारी आली. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या आपल्या कुटुंबासाठी सबिताला काहीतरी करून दाखवायचे होते. म्हणून पणजी येथील एका विशेष विद्यालयात सबिताने प्रवेश मिळवला. येथेच तिची टेबल टेनिसबद्दलची रुची वाढली. अथक प्रयत्न आणि सातत्यामुळे सबिता स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरली आणि सोमवारी तिने दुहेरी आणि एकेरी या दोन्ही स्पर्धेत पदक मिळवले.

2015पासून सबिता या स्पर्धेसाठी तयार करत आहे. दरम्यान या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याचा मार्ग तितकासा सोपा नाही. कारण या खेळांमध्ये पात्र होण्याकरिता खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम खेळ करावा लागतो. त्यामुळे सबिताचे या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पदक तालिकेत भारत टॉपवर

स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारत 163 पदकांसह पहिल्या स्थानावर आहे आहेत. त्यात 44 सुवर्ण, 52 रौप्य आणि 67 कांस्य पदकांचा समावेश आहेत. पदक तालिकेत चीन दुसऱ्या स्थानावर आहे.


VIDEO : अजित पवारांना भेटलो होतो, पण.., राज ठाकरेंचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 09:05 PM IST

ताज्या बातम्या