Home /News /sport /

वनडे सीरीज जिंकल्यानंतर द. आफ्रिकेच्या क्रिकेटरने दिली ‘जय श्रीराम’ची घोषणा; पोस्ट व्हायरल

वनडे सीरीज जिंकल्यानंतर द. आफ्रिकेच्या क्रिकेटरने दिली ‘जय श्रीराम’ची घोषणा; पोस्ट व्हायरल

Keshav Maharaj

Keshav Maharaj

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिका (SA vs IND) संपली आहे. यजमानांनी कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला. ही मालिका जिंकल्यानंतर केशव महाराजने (Keshav Maharaj) आपल्या इन्स्टाग्रामवर ‘जय श्रीराम’ म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 25 जानेवारी: दक्षिण अफ्रिका आणि भारत (South Africa vs India 3rd ODI )  यांच्यातील अखेरचा वनडे सामना रविवारी (23 जानेवारी) खेळला गेला. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण अफ्रिकेने भारताला क्लीन स्वीप देत मालिका 3-0 ने नावावर केली. पण क्रिकेट जगतात हार पराभवची चर्चा न रंगता एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज (Keshav Maharaj) याने विजयाचा आनंद साजरा करताना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख आपल्या सोशल पोस्टमध्ये केला आहे. केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर केशव महाराजने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या पदरी घोर निराशा आली. अखेरच्या वनडे सामनाही भारताला गमवावा लागला आहे. संपूर्ण टीम 283 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने वन डे सिरीज 3-0 ने गमावली. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयानंतर अनेक क्रिकेटर्सनी सोशल पोस्ट करत आनंद व्यक्त केला पण केशव महाराजच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काय म्हटले आहे पोस्टमध्ये? आपल्या इंस्टाग्रामवर विजयी पोस्ट शेअर करत ‘आमच्यासाठी ही एक चांगली मालिका ठरली. या संघावर यापेक्षा अधिक अभिमान वाटू शकत नाही. आम्ही खुप पुढे आलो आहोत. आता पुन्हा तयार होण्याची आणि पुढचे आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. जय श्री राम.’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
  दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने जय श्री राम चा उल्लेख पोस्टमध्ये केल्याने क्रिकेट जगतात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पोस्टमध्ये जय श्री राम उल्लेख करण्यामागचे कारण काय? केशव महाराज दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा भाग असला, तरी तो मुळचा भारतीय वंशाचा आहे. त्याचे वडील अथमानंद हे भारतीय आहेत. ते सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील नताल प्रांताकडून खेळले. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघात त्यांना प्रवेश मिळाला नाही. केशव महाराजच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचे कुटुंब डरबनमध्ये राहत असले तरी ते अजूनही भारताच्या संस्कृतीवर विश्वास ठेवतात आणि सर्व सण साजरे करतात. त्याची बहीण तरिश्मा हिने श्रीलंकन ​​नागरिकाशी लग्न केले. केशव महाराजांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते 2 वर्षांचे असताना किरण मोरे यांना दक्षिण आफ्रिकेतच भेटले. त्यादरम्यान किरण मोरे यांनी महाराज एक दिवस दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार असल्याचे भाकीत केले होते ते खरे ठरले. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून एक महत्वाचा फिरकी गोलंदाज म्हणून खेळला. फक्त गोलंदाज म्हणून नाही, तर तो फलंदाजीही करतो. 31 वर्षांच्या या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत 36 कसोटी, 15 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 155 विकेट्स आणि 835 धावा आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: South africa

  पुढील बातम्या