‘कार्तिकने माझ्या करिअरचं वाटोळं केलं, तो माफीच्या लायक नाही'

‘कार्तिकने माझ्या करिअरचं वाटोळं केलं, तो माफीच्या लायक नाही'

भारतीय संघाबाहेर असलेल्या दिनेश कार्तिकवर क्रिकेटपटूचा गंभीर आरोप.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारताचा जलद गोलंदाज एस श्रीसंतवर (S Sreesanth) आयपीएल 2013मध्ये सामना फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अडकल्यामुळं श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर फिक्सिंगच्या आरोपामुळं श्रीसंतला 26 दिवसांचा कारावास भोगावा लागला होता. मात्र काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयच्या वतीनं ही बंदी हटवण्यात आली आहे. दरम्यान आता श्रीसंतनं भारताचा विकेटकिपर दिनेश कार्तिकवर गंभीर आरोप केले आहेत. श्रीसंतच्या मते कार्तिकमुळं त्याचे करिअर संपले. श्रीसंतच्या या आरोपावर आता कार्तिकनं प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत श्रीसंतनं, “दिनेश कार्तिकनं 2013मध्ये माझी तक्रार त्यावेळी बीसीसीआयचे प्रमुख एन श्रीनिवासन यांच्याकडे केली होती. कार्तिकनं श्रीनिवासन यांना मी त्यांच्या प्रती अपशब्द वापरले असे सांगितले. त्यामुळं माझे करिअर संपले”, असे सांगितले. श्रीसंतच्या मते ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणार होती. कार्तिकच्या या तक्रारीमुळं श्रीसंतला संघात जागा देण्यात आली नाही.

वाचा-रोहित शर्माचा ICC रॅकिंगमध्येही जलवा, पहिल्यांदाच केली 'दस नंबरी' कामगिरी

श्रीसंतने 2005 मध्ये लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने 27 कसोटीत 87 विकेट घेतल्या आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत. मार्च 2019 मध्ये श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयानं हटवली होती. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे. श्रीसंतला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्याची शिक्षा निश्चित करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयने श्रीसंतच्या बंदीवर विचार करावा. आजीवनं बंदीची शिक्षा जास्त आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

वाचा-एका षटकात 17 चेंडू टाकणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती, धोनीने दिली होती संधी!

कार्तिकमुळं संपल करिअर-श्रीसंत

श्रीसंतनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, “चॅम्पियन्स ट्रॉफी 2013मध्ये कार्तिकनं माझे करिअर संपवले. तु जर हे वाचत आहेस तर, समजून घे की तुझ्यामुळं माझ करिअर संपलं. मी किंवा माझे कुटुंबिय तुला कधीच माफ करणार नाहीत. पुढच्या वर्षी केरळ विरुद्ध तमिळनाडू असा सामना होणार आहे. त्यामुळं त्यावेळी काय होईत ते तुच बघ”, असे सांगत कार्तिकवर गंभीर आरोप केले.

वाचा-सामन्याआधी देश सोडून पाकिस्तानात गेला क्रिकेटपटू, संघ सहकारी बसले शोधत!

दिनेश कार्तिकनं दिली प्रतिक्रिया

दरम्यान या सगळ्यावर दिनेश कार्तिकनं प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्तिकनं, “मी श्रीसंतनं माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत ऐकले आहे. यावर भाष्य करनेही बावळटपणा आहे”, असे सांगत या आरोपांचे खंडन केले. दिनेश कार्तिक सध्या विजय हजारे करंडक स्पर्धेत तमिळनाडू संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा संघ सध्या सेमीफायनलमध्य पोहचला आहे. तर, श्रीसंत आणि कार्तिक दोन्ही खेळाडूंना टीम इंडियात सध्या जागा मिळालेली नाही. दरम्यान कार्तिक वर्ल्ड कप 2019मध्ये भारताकडून खेळला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2019, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading