मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'बलात्कार आणि हत्या केलेले आरोपी मला शिव्या घालायचे', क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

'बलात्कार आणि हत्या केलेले आरोपी मला शिव्या घालायचे', क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

सहा महिने तुरूंगात असताना श्रीसंतनं पाचवेळा आत्महत्या करण्याच प्रयत्नही केला होता.

सहा महिने तुरूंगात असताना श्रीसंतनं पाचवेळा आत्महत्या करण्याच प्रयत्नही केला होता.

सहा महिने तुरूंगात असताना श्रीसंतनं पाचवेळा आत्महत्या करण्याच प्रयत्नही केला होता.

  • Published by:  Akshay Shitole

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारताचा जलद गोलंदाज एस श्रीसंतवर (S Sreesanth) आयपीएल 2013मध्ये सामना फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अडकल्यामुळं श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यापासून बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर फिक्सिंगच्या आरोपामुळं 26 दिवस श्रीसंतला तिहार जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली होती. दरम्यान जेलमधून बाहेर पडल्यानंतर श्रीसंत काहीकाळ डिप्रेशनमध्ये होता.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतनं डिप्रेशनबाबत आणि तुरूंगातील राहणीमानाबाबत धक्कादायक खुलासा केला. पहिल्यांदाच श्रीसंतनं आपल्या जेलमध्ये घालवलेल्या काळाबद्दल चर्चा केली. श्रीसंत रूंगात असताना बलात्कार, हत्या केलेल्या आरोपींसोबत राहत होतो. याबाबत सांगताना श्रीसंतने, " ते लोक मला शिव्या घालायचे, प्रत्येक शब्दात शिव्या असायच्या. त्यामुळं मी खुप घाबरून जायचो. या गोष्टी मी अनेक वेळा अनुभवल्या आहेत. याचमुळे मला आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्या यायचे", असा धक्कादायक खुलासा केला आहे.

वाचा-श्रीसंतचा मोठा खुलासा, ‘पाच वेळा केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न कारण...’

श्रीसंतला झालेल्या मानसिक त्रासामुळं त्याला डॉक्टरांची मदतही घ्यावी लागली होती. त्यामुळं मानसिक संतुलन बिघडलेल्या श्रीसंतला क्रिकेटपासून लांब रहावे लागले. 2015 मध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलासह 36 आरोपींची पाटियाला हाउस कोर्टानं निर्दोष मुक्तता केली होती.

श्रीसंतने 2005 मध्ये लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने 27 कसोटीत 87 विकेट घेतल्या आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-पाकिस्तानचा भारताला अल्टिमेटम, दिली जूनपर्यंतची मुदत!

मार्च 2019 मध्ये श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयानं हटवली होती. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे. श्रीसंतला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्याची शिक्षा निश्चित करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयने श्रीसंतच्या बंदीवर विचार करावा. आजीवनं बंदीची शिक्षा जास्त आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

वाचा-ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी क्रिकेटरनं विकलं घर,'म्हणाला लढणार तर युवराजसारखा'

‘सहा महिन्यात पाचवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न’

या मुलाखतीत श्रीसंतनं, “जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो. तेव्हा जवळ जवळ सहा महिने मी डिप्रेशनमध्ये होते. मी झोपू शकत नव्हतो. काही कारण नसताना रडायचो. अनेक वेळा स्वत:ला सांभाळायणे कठिण झाले होते”, असे सांगितले. तसेच श्रीसंतनं, “मी कधीच कोणाचे वाईट केले नाही, त्यामुळं माझ्यासोबत असे का झाले याचा विचार मी रात्रंदिवस करत होतो. पण मला कधीच उत्तर सापडले नाही. माझ्या एका चुकीची किंमत माझ्यासह परिवाराला भोगावी लागली, याचं दु:ख मला आजही आहे”, असे सांगितले.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

First published:

Tags: Ipl fixing, S sreesanth