Home /News /sport /

IND vs SA : ऋतुराजची ओपनिंग निश्चित, या कारणासाठी झाली टीम इंडियात निवड!

IND vs SA : ऋतुराजची ओपनिंग निश्चित, या कारणासाठी झाली टीम इंडियात निवड!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी (India vs South Africa) टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) फिट न झाल्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

    मुंबई, 1 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी (India vs South Africa) टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) फिट न झाल्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीमचा उपकर्णधार आहे. तसंच फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी महाराष्ट्राच्या या खेळाडूचं कौतुक केलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19, 21 आणि 23 जानेवारीला तीन वनडे मॅच (ODI Series) खेळवल्या जाणार आहेत. 'ऋतुराजला योग्य वेळी संधी मिळत आहे. तो टी-20 टीममध्ये होता आणि आता वनडे टीममध्येही आहे. त्याला टीममध्ये स्थान मिळावं, कारण तो देशासाठी यशस्वी होईल, असं निवड समितीला वाटतंय,' असं चेतन शर्मा म्हणाले. पुण्याच्या 24 वर्षांच्या ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये 635 रन केले आणि चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका निभावली. 'आम्ही ऋतुराजची निवड केली आहे, आता टीमने त्याला कधी खेळवायचं, त्याची गरज केव्हा आहे, याचा निर्णय घ्यायचा आहे,' अशी प्रतिक्रिया चेतन शर्मा यांनी दिली. 'ऋतुराज न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीममध्ये होता आणि आता वनडे टीममध्येही आहे. चांगल्या कामगिरीचा पुरस्कार त्याला मिळाला आहे,' असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं. आयपीएलमधल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला. 5 सामन्यांमध्ये त्याने तब्बल 603 रन केल्या. 168 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. मागच्या वर्षी जुलै महिन्यात कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वनडे सीरिजसाठी भारतीय टीम केएल राहुल (Capt), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉश्गिंटन सुंदर, जसप्रीत बुमराह (vc), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसीद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या