कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

टीम इंडिया ए संघानं वेस्ट इंडिज ए संघाला 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1नं विजय मिळवला.

  • Share this:

अँटिगा, 23 जुलै : भारताचे सिनिअर खेळाडू 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर लवकरच रवाना होणार आहेत. मात्र याआधीच भारताच्या ज्युनिअर खेळाडूंनी वेस्ट इंडिजचा मानहानीकारक पराभव करत विजय मिळवला. टीम इंडिया ए संघानं वेस्ट इंडिज ए संघाला 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1नं विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा खेळाडू शुभमन गील याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. मात्र, या मालिकेत सर्वांचे मन जिंकले ते एका पुणेकर खेळाडूनं.

महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट खेळणारा पुणेकर ऋतुराज गायकवाड यानं वेस्ट इंडिज विरोधात चार सामन्यात दोन अर्धशतक लगावत 207 धावा केल्या. शेवटच्या सामन्यात केवळ एका धावांनी त्याचे शतक हुकले. ऋतुराज 99 धावांवर बाद झाला. मात्र, गेल्या काही महिन्यात ऋतुराज टीम इंडिया 'ए'साठी रनमशीन ठरत आहे. 8 सामन्यात त्यानं 112.83च्या सरासरीनं 677 धावा केल्या आहेत.

याआधी श्रीलंका ए विरोधात झालेल्या मालिकेत त्यानं 5 सामन्यात 470 धावा केल्या होत्या. या मालिकेत ऋतुराजनं नाबाद 187, नाबाद 125, 84 आणि 74 धावांची खेळी केली आहे. 4 सामन्यात तो केवळ 2 वेळा बाद झाला. 22 वर्षांचा ऋतुराज रणजीमध्ये महाराष्ट्रासाठी सलामीला फलंदाजी करतो. आयपीएलमध्ये ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो, मात्र त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.

वाचा-INDvsWI : भारताविरुद्ध मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

वाचा-वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताच्या 'या' सात रत्नांची हुकली संधी!

प्रथम श्रेणीतही रनमशीन

प्रथम श्रेणीतील 12 सामन्यात ऋतुराजनं 38.17 सरासरीत 813 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, लिस्ट एमध्ये 39 सामन्यात त्यानं 57.08च्या सरासरीनं 2055 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

लवकरच मिळू शकते टीम इंडियाचे तिकिट

20व्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळू शकते. सलामीचा फलंदाज असलेल्या ऋतुराजला वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थान मिळाले नसले तरी, येणाऱ्या काही महत्त्वाच्या मालिकांमध्ये संधी मिळू शकते.

वाचा-World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

First Published: Jul 23, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading