ऋतुराज गायकवाड; टीम इंडियात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा पहिलाच क्रिकेटपटू

ऋतुराज गायकवाड; टीम इंडियात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा पहिलाच क्रिकेटपटू

श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी टीम इंडियाची (India vs Sri Lanka) निवड करण्यात आली. यात पिंपरी-चिंचवडकर (Pimpari Chinchwad) असलेल्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) समावेश आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 11 जून : श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी टीम इंडियाची (India vs Sri Lanka) निवड करण्यात आली. यात पिंपरी-चिंचवडकर (Pimpari Chinchwad) असलेल्या ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधून टीम इंडियामध्ये निवड होणारा ऋतुराज गायकवाड पहिलाच खेळाडू आहे. कठोर मेहनत आणि संयम यामुळे 24 वर्षांच्या ऋतुराजला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. 13 जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे.

ऋतुराज गायकवाडच्या यशाचा प्रवास दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला ऋतुराजला महाराष्ट्राच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) त्याला फार चमकदार कामगिरी करता आली नाही, पण आयपीएलमध्ये (IPL 2021) मात्र ऋतुराज फॉर्ममध्ये आला. या मोसमात त्याने दोन अर्धशतकं केली, तसंच फाफ डुप्लेसिससोबत (Faf Du Plessis) त्याने चेन्नई सुपरकिंग्सला चांगली सुरुवातही करून दिली.

'भारतासाठी निवड झाल्यामुळे मी आनंदी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेन, अशी आशा आहे. टीममध्ये निवड होईल का नाही, याबाबत मी फार विचार करत नव्हतो, पण डोक्यात त्या गोष्टी होत्या. आता संधी मिळाली आहे, त्यामुळे देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन,' असं ऋतुराज इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला.

आयपीएलच्या मागच्या मोसमात लागोपाठ तीन अर्धशतकं केल्यानंतर ऋतुराज प्रकाशझोतात आला, यानंतर त्याच्या तंत्राचंही कौतुक करण्यात आलं. दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांच्या अकॅडमीमध्ये ऋतुराजने क्रिकेटचे धडे गिरवले. वेंगसरकर यांनी ऋतुराजची टीम इंडियात निवड झाल्यानंतर मोलाचा सल्ला दिला आहे. 'स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची ही ऋतुराजला सुवर्णसंधी आहे. अशा संधी सहज मिळत नाहीत, त्यामुळे त्याने भरपूर आणि सातत्याने रन करावे,' असं वेंगसरकर यांनी सांगितलं. ऋतुराजने चांगल्या सुरुवातीनंतर मोठा स्कअर करावा आणि मैदानात शांत राहावं, असा सल्लाही वेंगसरकरांनी दिला आहे.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 4:06 PM IST

ताज्या बातम्या