प्रतिस्पर्ध्याचा जीवघेणा पंच, बॉक्सरचा झाला मृत्यू; पाहा VIDEO

13 लढतीत अपराजित असलेल्या मॅड मॅक्स मृत्यूसोबतची झुंज मात्र हरला.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 12:53 PM IST

प्रतिस्पर्ध्याचा जीवघेणा पंच, बॉक्सरचा झाला मृत्यू; पाहा VIDEO

मॉस्को, 24 जुलै : खेळाच्या मैदानावर अनेकदा दुर्दैवी घटना बघायला मिळतात. मैदानावरच खेळाडूचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. क्रिकेटमध्ये फिल ह्यूजच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्व हादरून गेलं होतं. आताही अशीच एक घटना घडली आहे. रशियाचा 28 वर्षीय बॉक्सर मॅक्सिमला लढतीवेळीच डोक्याला जबरदस्त दुखापत झाली. त्यानंतर त्याची सर्जरी झाली. गेल्या 13 लढतीत अपराजित असलेला मॅक्सिमची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली.

आयबीएफ ज्यूनिअर वेल्टरवेट स्पर्धेच्या बाद फेरीत मॅक्सिमची लढत सुब्रिल मटियास याच्याशी होती. यावेळी त्याला जखम झाली. डोक्यातून रक्त आल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. शुक्रवारी त्याला दुखापत झाली. त्यानंतर शनिवारी डॉक्टरांनी त्याचा ब्रेन डॅमेज झाल्याचं सांगितलं. अखेर मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली.

मटियास आणि दादाशेव्ह यांच्यात जबरदस्त लढत सुरु होती. मात्र 11 व्या राउंडनंतर दादाशेव्हच्या ट्रेनरनं लढत थांबवली. त्यांना दादाशेव्हला जास्त दुखापत झाल्याचं जाणवलं. त्यानंतर जखमेमुळं दादाशेव्हने रक्ताच्या उलट्या केल्या. मॅड मॅक्स नावाने प्रसिद्ध असलेला दादाशेव्ह ड्रेसिंगरूपर्यंत जाण्याच्या अवस्थेतही नव्हता. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या डोक्याला सूज आली होती. त्यानंतर शस्त्रक्रियाही झाली. गेल्या 13 लढतीत अपराजित असलेल्या दादाशेव्हला शेवटच्या लढतीत रिंगमधून स्ट्रेचरवरून न्यावं लागलं.

भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला टी20 सामना ठरला होता अखेरचा!

Loading...

भररस्त्यात पत्नीचा छळ; केस ओढून अमानुष मारहाण, घटनेचा CCTV VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...