क्रिकेट खेळ नाही, 'या' देशानं नाकारला दर्जा!

क्रिकेट खेळ नाही, 'या' देशानं नाकारला दर्जा!

1870 पासून रशियात क्रिकेट खेळलं जात असून 2017 मध्ये आयसीसीनं त्यांना असोसिएट मेंबरचा दर्जा दिला होता.

  • Share this:

मॉस्को, 20 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धा झाल्यानंतर नुकतंच आयसीसीनं झिम्बाम्बे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर एका मोठ्या देशानं क्रिकेटला खेळाचा दर्जा देण्यास नकार दिला आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर काही दिवसांच्या आतच रशियाने क्रिकेट खेळ नसल्याचे अधिकृतपणे जाहीर केलं आहे. रशियन सरकार क्रिकेटला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाही.

रशियाने क्रिकेटशिवाय म्यूथाई जो बॉक्सिंगमधीलच थायलंडमध्ये खेळला जाणारा एक प्रकार आहे त्यालाही खेळाचा दर्जा देण्यास नकार दिला आहे. क्रिकेट आणि म्यूथाई हे दोन्ही खेळ रशियन सरकारच्या नियमांची पूर्तता करत नाहीत.

फूटबॉलनंतर जगभरात क्रिकेटची लोकप्रियता आहे असं मानलं जातं. नुकताच क्रिकेटचा महासंग्राम इंग्लंडमध्ये पार पडला. अद्याप अंतिम सामन्याची चर्चा सुरू असताना रशियानं मात्र क्रिकेटला खेळाचा दर्जा देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे रशियात 1870 पासून क्रिकेट खेळलं जात आहे. आयसीसीने 2017 मध्ये त्यांना असोसिएट मेंबरचा दर्जा दिला होता.

रशियात फुटगोल्फ, स्पोर्ट्स योगा, मॉ़डल प्लेन फ्लाइंग, डार्ट्स आणि कोर्फबॉल यांना खेळाचा दर्जा आहे. यातील काही खेळांची नावंसुद्धा जगातील काही देशांना माहिती नसतील. तरीही रशियाने क्रिकेटला नाही तर या खेळांना दर्जा दिला आहे.

खेळाडूंसाठी खूशखुबर! फुटबॉलमधला 'तो' क्रिकेटमध्ये नियम लागू झाल्यानं होणार फायदा

SPECIAL REPORT : अंबाबाईची मूर्ती बदलणार? काय आहे नेमका वाद?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या