VIDEO : रसेल झाला बोल्ड, पण अश्विनमुळं त्याला मिळालं जीवनदान

VIDEO : रसेल झाला बोल्ड, पण अश्विनमुळं त्याला मिळालं जीवनदान

पंजाबचा कर्णधार आर अश्विन याची एक चुक त्याच्या संघाला महागात पडली. या एका चुकीमुळं पंजाबनं सामना गमावला.

  • Share this:

कोलकता, 27 मार्च : ईडन गार्डनच्या ऐतिहासिक मैदानावर कोलकता आणि पंजाब यांच्यात सामना रंगत असताना, पंजाबचा कर्णधार आर अश्विन याची एक चुक त्याच्या संघाला महागात पडली. अश्विनच्या या एका चुकीमुळं कोलकतानं 200चा टप्पा गाठला, आणि पंजाबनं सामना गमावला.

तर, झालं असं की, पंजाबसाठी धोकादायक असणाऱ्या आंद्रे रसेलला बाद करण्यासाठी पंजाबचे गोलंदाज प्रयत्न करत होते. त्यातच मोहम्मद शमीनं आपल्या 17व्या ओव्हरमध्ये जबरदस्त यॉर्करवर रसेलला बोल्ड केले आणि शमीसह सर्व खेळाडूंनी आनंदही साजरा केला. मात्र, अम्पायरने या बॉलला नो बॉल देण्याचा निर्णय घेतला. कारण ज्या चेंडूवर शमीनं रसेलची विकेट घेतली होती, त्यावेळी अश्विननं तीन फिल्डर तीन यार्डच्या आत उभे केले होते. त्यामुळे अम्पायरने या बॉलला नो बॉल घोषित केला, त्यामुळे रसेलला एक जीवनदान मिळाले. त्यावेळी रसेलच्या फक्त तीन धावा होत्या.

हे जीवनदान मिळाल्यानंतर रसेलचं वादळ थांबलचं नाही. त्यानंतर केवळ तीन ओव्हरमध्ये रसेलने 12 चेंडूत 44 धावा केल्या. टायच्या 18व्या ओव्हरमध्ये रसेलनं 2 षटकार 2 चौकार लगावले. यानंतर रसेल शमीवर बरसला. शमीच्या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉलमध्येच रसेलनं तीन षटकार मारले. यामुळं कोलकतानं पंजाबला 218 धावांचे आव्हान दिले.

POINTS TABLE:

SCHEDULE TIME TABLE:

ORANGE CAP:

PURPLE CAP:

RESULTS TABLE:

VIDEO ईशान्य मुंबई : जागा भाजपची लॉबिंग 'मातोश्री'वर; सोमय्यांवर टांगती तलवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading