VIDEO : ईडन गार्डनवर असं घोंगावलं रसेलचं वादळ

हैदराबादला उद्धवस्त केल्यानंतर रसेल नावाच्या या वादळानं आज पंजाबला नेस्तनाबूद केले.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 11:55 PM IST

VIDEO :  ईडन गार्डनवर असं घोंगावलं रसेलचं वादळ

कोलकता, 26 मार्च : कोलकता आणि पंजाब यांचा सामना हा खऱ्या अर्थानं आयपीएलचा सामना होता. पण या सामन्यातही वादळ घोंगावलं ते आंद्रे रसेलचंच. रसेलनं आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर 17व्या ओव्हरमध्ये कोलकताला 200चा आकडा पार करून दिला. त्यामुळं पुन्हा एकदा ईडन गार्डनवर रसेलची जादू पाहायला मिळाली.

दरम्यान टॉस जिंकत पंजाबच्या संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ईडन गार्डनचा स्टेडियम फलंदाजांसाठी पुरक असताना, अश्विननं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या शेवटच्या तीन षटकांत आंद्रे रसेल आणि रॉबीन उथप्पा यांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 219 धावांचे आव्हान ठेवले.


प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघानं सलामी फलंदाजांना स्वस्तात बाद केलं. क्रिस लिन 10 धावा करत बाद झाला, तर पंजासाठी धोकादायक असणारा धडाकेबाज फलंदाज सुनील नारायण केवळ 24 धावा करत बाद झाला. मात्र, त्याच्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांनी आक्रमक फलंदाजी केली. राणानं 34 चेंडूत सात षटकार ठोकत 63 धावा केल्या.

कोलकता आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. त्यातील 15 सामने कोलकताच्या संघाने तर, 8 सामने पंजाबनं जिंकले आहेत. त्यामुळे अर्थातच कोलकताचे पारडे जास्त जड आहे. त्यातच आज त्यांचा सामना आपल्या घरच्या मैदानावर होत असल्यामुळे याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.

Loading...


POINTS TABLE:



SCHEDULE TIME TABLE:



ORANGE CAP:



PURPLE CAP:



RESULTS TABLE:




VIDEO ईशान्य मुंबई : जागा भाजपची लॉबिंग 'मातोश्री'वर; सोमय्यांवर टांगती तलवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...