धावपटूने नाही तर कॅमेरामनने जिंकली शर्यत, VIDEO पाहून तुम्हाही हसून लोटपोट व्हाल

धावपटूने नाही तर कॅमेरामनने जिंकली शर्यत, VIDEO पाहून तुम्हाही हसून लोटपोट व्हाल

सध्या धावण्याच्या शर्यतीत धावपटू नाही तर कॅमेरामन जिंकतो असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सध्या टिकटॉकची चर्चा जोरात सुरू आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकपेक्षा सध्या टिकटॉक जास्त वेगानं लोकप्रिय होत आहे असं म्हटलं. टिकटॉकचे व्हिडिओ इतर प्लॅटफॉर्मवरसुद्धा व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हायरल व्हिडिओ बिग बी अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. एका चाहत्याने व्हिडिओ शेअर करताना बिग बींना विचारलं होतं की, सांगा यात जिंकलं कोणं, धावपटू की कॅमेरामन?

बीग बींच्या चाहत्यानं शेअर केलेल्या पोस्टत एका शर्यतीच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ आहे. यामध्ये क्रॉस लाइन पार करणारा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कॅमेरामन धावपटूंच्याही पुढे धावतो आणि धावपटूंच्या आधीच क्रॉसलाइन पार करतो. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना धावपटू जिंकले की कॅमेरामन असं म्हटलं आहे.

चाहत्यांनी यावर कमेंट करताना म्हटलं आहे की, कॅमेरामन फक्त 50 मीटर धावला आहे आणि खेळाडू किमान 1 ते 5 किमी धावले असतील. त्यामुळे कॅमेरामन वेगानं धावू शकला.

प्रत्यक्षात मात्र या व्हिडिओचं सत्य वेगळंच आहे. ऑलिम्पिक स्पर्धेवेळी तयार करण्यात आलेली ती एक जाहीरात आहे. एनर्जी ड्रिंकच्या या जाहीरातीमध्ये कॅमेरामन ऑलिम्पिक मेडल जिंकतो असं दाखवण्यात आलं आहे.

Loading...

जाहीरातीमध्ये एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे कॅमेरामन जोरात धावतो आणि धावपटूंपेक्षा पुढे जातो असं दृश्य जाहीरातीत दाखवण्यात आलं आहे. तीन वर्षांपूर्वी ही जाहीरात तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता टिकटॉकमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

VIDEO : तावडेंना आता कळलं असेल, यादीत नाव नसलं की कसं वाटतं? एकच सोशलकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: athletes
First Published: Oct 5, 2019 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...