VIDEO : स्टायलिश बोल्ट, 7 वर्षाच्या ब्लेझचा वेग पाहून तुम्हीही चकित व्हाल

VIDEO : स्टायलिश बोल्ट, 7 वर्षाच्या ब्लेझचा वेग पाहून तुम्हीही चकित व्हाल

रुडॉल्फच्या वेगाबरोबरच त्याच्या स्टाईलचेही चाहते आहेत.

  • Share this:

फ्लोरिडा, 14 फेब्रुवारी : कोणी जमैकाचा धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडेल असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या उसेन बोल्टने 2009 मध्ये 100 मीटर स्पर्धेत 9.58 सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवली होती. तेव्हापासून त्याच्या नावावरच हा विक्रम आहे.

आता एका मुलाच्या धावण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तो अॅथलीट असून त्याचा वयाच्या 7व्या वर्षी असलेला धावण्याचा वेग पाहिल्यास उसेन बोल्टचा विक्रम मोडू शकेल असं वाटतं. या मुलाचं नाव रुडॉल्फ इनग्राम आहे. त्याने आपल्या वेगाने अनेकांना वेड लावलं आहे. त्याला ब्लेझ नावानेही ओळखलं जातं. रुडॉल्फच्या वेगाबरोबरच त्याच्या स्टाईलचेही चाहते आहेत.अमेरिकेत राहणाऱ्या रुडॉल्फचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याने एका 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 13.48 सेंकद वेळ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेत त्याने 14.59 सेंकदात 100 मीटर अंतर कापले होते. त्याशिवाय 60 मीटर अंतर 8.69 सेकंदात पार केले आहेत. रुडॉल्फने शेअर केलेल्या व्हिडिओत इतर प्रतिस्पर्धी त्याच्या आसपासही दिसत नाहीत.शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत कमी वेळेचा विक्रम उसेन बोल्टच्या नावावर आहे. या विक्रमापासून रुडॉल्फ काही सेंकद दूर आहे. त्याचे वय पाहता बोल्टचा विक्रम तो मोडू शकतो. रुडॉल्फचे वडील फुटबॉल प्रशिक्षक आहेत. त्यांनाही आपल्या मुलाने बोल्टचा विक्रम मोडून इतिहास रचावा असं वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या