RCB vs RR : विराटच्या आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नावर 'पाणी', सामना अनिर्णित

RCB vs RR : विराटच्या आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नावर 'पाणी',  सामना अनिर्णित

श्रेयसनं आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि स्टोईनिस यांना बाद करत आपली हॅट्रिक पुर्ण केली.

  • Share this:

बंगळुरू, 30 एप्रिल : पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेला रोमहर्षक ५ ओव्हरचा सामना अखेर 'पाण्यात' गेला. पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आले. बंगळुरू संघाला १ गुण मिळाला असला तरी आयपीएलमधला विराट सेनेचा प्रवास संपला आहे.

बंगळुरूनं आधी फलंदाजी करत ५ ओव्हरमध्ये 63 धावा केल्यात. ६३ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयलने धडाक्यात सुरूवात केली. तिसऱ्या ओव्हरपर्यंत संजू समसँन आणि एल लिव्हमस्टनने 41 धावांची खेळी केली.परंतु, संजू हा 28 धावा करून बाद झाला.त्यांने १३ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार लगावून टीमच्या विजयाचा मार्ग मोकळा ककून दिला. परंतु, पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना रद्द अनिर्णित घोषित करावा लागला.

दरम्यान, श्रेयस गोपालच्या हॅट्रिकमुळं बंगळुरू संघाला जास्त धावांची मजल मारता आली नाही. श्रेयसनं आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि स्टोईनिस यांना बाद केल.

दरम्यान, सामन्यात राजस्थाननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळं हा सामना आता केवळ 5 षटकांचा करण्यात आला. यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं पहिल्याच चेंडूत षटकार खेचत आक्रमक सुरुवात केली. मात्र, 25 धावा करत विराट बाद झाला. त्यानंतर श्रेयसच्या फिरकीपुढं कोणताच फलंदाज टिकू शकला नाही. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याला विराटनं आधी एक षटकार मग चौकार लगावला, त्यानंतर चौथ्या चेंडूवर विराट, पाचव्या चेंडूवर एबी तर, सहाव्या स्टोईनिसची विकेट घेतली.

दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ऐवजी स्टीव्ह स्मिथला नेतृत्व दिल्यानंतर राजस्थाननं सलग सामने जिंकले. मात्र, आज यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणारा स्मिथ राजस्थानला आणखी एक विजय मिळवून देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत स्मिथकडे राजस्थानचे नेतृत्व सोपवण्यात आले. तेव्हापासून चारपैकी तीन सामने जिंकून राजस्थानने बाद फेरीच्या शर्यतीत स्वत:चे आव्हान कायम राखले आहे.

दुसरीकडे रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे विराट कोहलीच्या बेंगळूरुला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. 12 सामन्यांतून चार विजय आणि आठ पराभवांसह गुणतालिकेच्या तळाशी असणाऱ्या बेंगळूरुला आता प्रतिष्ठेसाठी खेळावे लागणार आहे.

VIDEO : या अपघातामुळं भारताला मिळाला रो'हिट' !

Tags: ipl 2019
First Published: Apr 30, 2019 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading