Home /News /sport /

लवकरच Dinesh Karthik इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुन्हा खेळू शकतो, du Plessis ने दिले संकेत

लवकरच Dinesh Karthik इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुन्हा खेळू शकतो, du Plessis ने दिले संकेत

Dinesh Karthik

Dinesh Karthik

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 मधील दुसरा विजय मिळवला आहे. आरसीबनं विजयासाठी आवश्यक असलेलनं 170 रनचं लक्ष 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 23 बॉलमध्ये 44 रनची नाबाद खेळी केली. सध्या क्रिकेट जगतात कार्तिकची चर्चा अधिक रंगली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 मधील दुसरा विजय मिळवला आहे. आरसीबनं विजयासाठी आवश्यक असलेलनं 170 रनचं लक्ष 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 23 बॉलमध्ये 44 रनची नाबाद खेळी केली. सध्या क्रिकेट जगतात कार्तिकची चर्चा अधिक रंगली आहे. अशातच आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) कार्तिकच्या चाहत्यांना दिलासादायक संकेत दिले आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मॅचविनिंग इनिंग खेळल्यानंतर दिनेश कार्तिकचे कर्णधार फाफ डू प्लेसिसने तोंडभरुन कौतुक केले. दिनेश कार्तिक पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. असे मोठे वक्तव्य डू प्लेसिसने केले आहे. IPL 2022 : बायकोचा धोका, धोनीचा अडथळा तरी मानली नाही हार! Inspirational आहे RCB च्या DK ची स्टोरी
  दिनेश कार्तिकने राजस्थानविरुद्ध 23 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी खेळली. केवळ 87 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर आरसीबी पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असताना त्याने ही खेळी खेळली. कार्तिकच्या या खेळीमुळे आरसीबीने आरआरवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला. कार्तिक त्याचे सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. मला वाटतं की त्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आपलं नाव ठेवावं. असे मत डू प्लेसिसने मॅच संपल्यानंतर व्यक्त केले. 'जेव्हा जिंकण्याची कोणतीही शक्यता नसते, तेव्हा तिथून सामना खेचण्यासाठी तुमच्याकडे उत्तम तग धरण्याची गरज असते आणि दिनेश कार्तिककडे ती गोष्ट आहे. त्याचा शांत स्वभाव इतरांना शेवटपर्यंत सामना घेण्यास प्रोत्साहित करतो. कार्तिकने आपल्या कारकिर्दीत अनेकदा टीम इंडियात पुनरागमन केले आहे. तो भारताकडून शेवटचा 2019 च्या विश्वचषकात खेळला होता. तो पुन्हा एकदा टीम इंडियात परतण्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी तो परतला तर तो फिनिशर म्हणून असेल. तो गेल्या काही काळापासून टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB

  पुढील बातम्या