IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना, विराटच्या संघात ‘महिलाराज’

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अजब घटना, विराटच्या संघात ‘महिलाराज’

विराटच्या संघानं IPLमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी, सगळ्या संघांना टाकले मागे

  • Share this:

बंगळुरू, 18 ऑक्टोबर : आयपीएल 2020साठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याआधीच संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. काही संघांचे खेळाडू तर काही संघांच्या स्टाफमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र विराटच्या रॉयल चॅलेंजर्च बंगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

विराटच्या संघानं रॉयल चॅलेंजर्स संघात एका महिलेचा समावेश केला आहे. आरसीबी संघात मसाज थेरेपिस्ट म्हणून नवनीता गौतम (Navnita Gautam) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये आरसीबी पहिला संघ ठरला आहे. ज्यानं पहिल्यांदा महिना सहयोगी स्टाफची नियुक्ती केली आहे. बंगळुरू संघानं दिलेल्या माहितीनुसार, “नवनीता मुख्य फिजिओथेरेपिस्ट असलेल्या इवान स्पीचली आणि शंकर बासू यांच्यसोबत काम करेल. खेळाडूंच्या फिटनेसपासून त्यांच्या आहाराची जबाबदारी नवनीताकडे असणार आहे.

RCB संघाची ऐतिहासिक कामगिरीनं सगळे खुश

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मुख्य संजीव चुडीवाला यांनी नवनीताच्या निवडीवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी, “आरसीबी संघानं अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे, त्यामुळं मी खुश आहे. महिला क्रिकेट संघानं पाहण्यापासून खेळण्यापर्यंत खुप मोठी कामगिरी केली आहे. खेळात सशक्तिकरण होणे गरजेचे आहे. खेळापासून स्टाफपर्यंत त्यांना संधी देणे गरजेचे आहे. सगळ्या खेळांमध्ये महिला आघाडीवर आहेत. त्यामुळं आरसीबीनं हा निर्णय घेतला आहे. नवनीतामुळं नवीन प्रतिभा आणि ऊर्जा संघात येईल”, असे सांगितले.

आरसीबीमध्ये झाले आणखी महत्त्वाचे बदल

रॉयल चॅलेंजर्स संघानं आयपीएल 2020साठी मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक यांच्यात बदल झाले आहे. न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हसन संघाचा संचालक असेल तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार साईमन कॅटिच मुख्य प्रशिक्षक असणार आहे. गेल्या हंगामात बंगळुरू संघानं वाईट कामगिरी केली होती. गुणतालिकेत बंगळुरू संघ आठव्या स्थानावर होता.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: iplRCB
First Published: Oct 18, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या