• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'मिस्टर 360 डिग्री' ने निवृत्तीची घोषणा करताच RCB ला मोठा धक्का, केले भावुक ट्विट

'मिस्टर 360 डिग्री' ने निवृत्तीची घोषणा करताच RCB ला मोठा धक्का, केले भावुक ट्विट

Royal Challengers Bangalore's emotional tweet

Royal Challengers Bangalore's emotional tweet

दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सच्या (AB de Villiers ) निवृत्तीच्या निर्णयाचा क्रिकेट जगतासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने (AB de Villiers ) शुक्रवारी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तो अखेरचे आयपीएल2021 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट जगतासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाला मोठा धक्का बसला आहे. भावुक ट्विट करत त्याला अलविदा म्हटले आहे. एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा सामना विजेता होता. मेगा लिलावापूर्वी बंगळुरूला निश्चितपणे त्याला कायम ठेवायचे होते, परंतु डिव्हिलियर्सने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आरसीबी संघाने ट्विट केले आहे ते सध्या व्हायरल होत आहे. 'एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एका युगाचा अंत झाला आहे. एबी तुझ्यासारखा कोणी नाही. आरसीबीमध्ये आम्हाला तुमची खूप आठवण येईल. हॅप्पी रिटायरमेंट लीजेंड' अशा आशयाचे ट्वीट आरसीबी संघाने केले आहे. डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या. डिव्हिलियर्सचा स्ट्राईक रेट 151 पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटने 3 शतके, 40 अर्धशतके झळकावली आहेत. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. 'माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. अशा आशयाची पोस्ट डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर केली आहे.
  First published: