एबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय

एबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय

एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबाज 90 धावांच्या खेळीवर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा गडी राखून शानदार विजय मिळवलाय.

  • Share this:

21 एप्रिल : एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबाज 90 धावांच्या खेळीवर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा गडी राखून शानदार विजय मिळवलाय. दिल्लीने दिलेलं 175 धावांचं आव्हान बंगळुरूने 18 षटकात पूर्ण केलं.

बंगळुरूने टाॅस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं. मात्र, दिल्लीची सुरुवात खराब राहिली. तिसऱ्याच षटकामध्ये कर्णधार गौतम गंभीर 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन राॅयही 5 धावा करून झटपट बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि  ऋषभ पंतने कमान सांभाळली. पंतने सर्वाधिक 85 धावा केल्यात. या बळावर दिल्लीने बंगळुरूला 175 धावांचं टार्गेट दिलं.

बंगळुरूने हे आव्हान 18च्या षटकात पूर्ण केलं. पण  ओपनिंग जोडी झटपट बाद झाल्यामुळे माघारी परतली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने 90 धावांची तुफान खेळी केली. 39 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकार लगावत 90 धावा करत टीमच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.

First published: April 21, 2018, 11:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading