मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO : रोनाल्डोने मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावला पण...

VIDEO : रोनाल्डोने मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावला पण...

ख्रिस्तियानो रोनाल्डोने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावली पण त्याला शिक्षा वर्तवण्यात आली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावली पण त्याला शिक्षा वर्तवण्यात आली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने(Cristiano Ronaldo) चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Champions League)मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावली पण त्याला शिक्षा वर्तवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रेफरीने त्याला पिवळे कार्ड दाखवले. त्यामुळे सामना जिंकला असला तरी रोनाल्ड़ोसाठी शेवट थोडासा कडू ठरला.

पुढे वाचा ...

मँचेस्टर,30 सप्टेंबर : ख्रिस्तियानो रोनाल्डोने(Cristiano Ronaldo) युव्हेंटस क्लब सोडून पुन्हा मँचेस्टर युनायटेडसोबत करार केला. 2009नंतर रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल झाला आहे. दाखल होताच त्याने आपल्या चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरला. रोनाल्डोने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Champions League)मँचेस्टरसाठी विजयी गोल झळकावला पण (Ronaldo late show gives Manchester United win over Villarreal)त्याला शिक्षा वर्तवण्यात आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मँचेस्टर युनायटेड आणि विलाररियल यांच्यात सामना खेळला गेला. शेवचच्या चार सामन्यात मँचेस्टरला तीन पराभव मिळाल्याने हा सामना जिंकणे संघासाठी महत्त्वाचे होते. विलाररियलविरुद्ध मँचेस्टरने 2-1 असा विजय नोंदवला. मँचेस्टरसाठी दुसरा गोल रोनाल्डोने अतिरिक्त वेळेत म्हणजेच ९५व्या मिनिटाला केला आणि मँचेस्टरने सामना जिंकला.

हे वाचा: SRH vs CSK, Dream 11 prediction : 'हे' 11 खेळाडू बनवू शकतात तुम्हाला मालामाल

या गोलमुळे आनंदित झालेल्या रोनाल्डोने आपली जर्सी काढत प्रेक्षकांमध्ये भिरकावली. रोनाल्डोने सामन्याचे चित्र पालटले असले, तरी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रेफरीने त्याला पिवळे कार्ड दाखवले. त्यामुळे सामना जिंकला असला तरी रोनाल्ड़ोसाठी शेवट थोडासा कडू ठरला.

 हे वाचा: T20 World Cup संघातून हार्दिक पांड्याला डच्चू? या युवा खेळाडूच्या नावाची चर्चा

असा रंगला सामना

पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात विलाररियलच्या पाको अल्कासरने 53व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. विलाररियलचा हा आनंद जास्तवेळ टिकला नाही. पुढच्या सात मिनिटात मँचेस्टरकडून एलेक्स टेलेसने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर निर्धारित वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरी राहिले.

सामन्याच्या 95व्या मिनिटाला रोनाल्डोने विलाररियच्या गोलकीपरला चकवत गोल नोंदवला.

First published: