Home /News /sport /

PHOTO रोहित करतोय बायकोला मिस, रोमॅंटिक कमेंट होतेय Viral

PHOTO रोहित करतोय बायकोला मिस, रोमॅंटिक कमेंट होतेय Viral

देशाबाहेर दौरा असला की टीममधील सर्वांनाच आपल्या कुटुंबीयांपासून दूर रहावं लागतं. पण ‘फॅमिली मॅन’ रोहित शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायरासाठी आपलं प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळाला.

पुढे वाचा ...
  मुंबई, 31 जानेवारी : भारत-न्यूझीलंडच्या चौथ्या सामनाही सुपर ओव्हरमुळे गाजला. भारताने याही मॅचमध्ये विजय मिळवत किवींचा धुव्वा उडवला. न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला आपल्या कुटुंबीयांसोबत तसा कमी वेळ घालवायला मिळत आहे. पण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते प्रत्यक्ष भेटून असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या कुटुंबीयांसोबत नेहमीच वेळ घालवताना दिसतो. देशाबाहेर दौरा असला की टीममधील सर्वांनाच आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहावं लागतं. पण रोहित शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नी रितीका सजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायराबरोबर प्रेमळ 'फॅमिली मॅन’ पाहायला मिळाला. रितीकाने आपल्या Instagramअकाउंटवर #HighOnSugar अशी कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे. त्यावर रोहितने Miss my Cutoos अशी कमेंट केली आहे.
  View this post on Instagram

  #HighOnSuGar ❤️

  A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

  न्यूझीलंडध्ये रोहित चौकार-षटकारांची आतषबाजी करत आहे. अशा वेळीही तो पत्नीला आणि मुलीला किती मिस करत आहे हे त्याच्या कमेंटवरुन समजतंय. रितीकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबातील एका लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने आपल्या मुलीसोबत आणि मैत्रिणींसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यापैकी रोहितने केलेल्या एका कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अन्य बातम्या सुपर ओव्हर पुन्हा ठरली किवींसाठी किलर! एका क्लिकवर पाहा 11 चेंडूंचा थरार ‘स्वत:च्या फायद्यासाठी मला...’, धोनीने केले साक्षीवर गंभीर आरोप! VIDEO VIRAL मालिका जिंकली पण टी-20 वर्ल्ड कप धोक्यातच! विराटला करावे लागतील 3 बदल 4 चेंडूत 4 धावा हव्या असताना रोहित स्टाइल षटकार, हरमनप्रीतचा VIDEO पाहिलात का?
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Instagram, Rohit sharma

  पुढील बातम्या