Home /News /sport /

'विराटकडून टेस्ट टीमची कॅप्टन्सीही हिसकावली जाईल', क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

'विराटकडून टेस्ट टीमची कॅप्टन्सीही हिसकावली जाईल', क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्याबाबत बीसीसीआयने (BCCI)जी पद्धत वापरली त्यावर अनेक दिग्गज नाराज आहेत.

    मुंबई, 11 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयने तीनच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट टीमची घोषणा केली, सोबतच वनडे टीमचा कर्णधार बदलण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्याबाबत बीसीसीआयने (BCCI)जी पद्धत वापरली त्यावर अनेक दिग्गज नाराज आहेत. विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या वनडे टीमचा कर्णधार असेल, असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं. बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ज्या पद्धतीने बीसीसीआयने विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवलं ते योग्य नाही. ही माहिती सार्वजनिक करण्यासाठी बोर्डाला आणखी चांगली पद्धत वापरता आली असती. विराटला सन्मान मिळाला पाहिजे होता, त्याचा तो हक्क आहे,' असं कनेरिया त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. राहुल द्रविडची (Rahul Dravid) एण्ट्री होताच विराटची कॅप्टन्सी जाणार हे निश्चित झालं होतं, असं वक्तव्यही कनेरियाने केलं, यासाठी त्याने विराटच्या अनिल कुंबळेसोबत (Anil Kumble) झालेल्या वादाचा हवाला दिला. 'कुंबळे आणि द्रविड दक्षिण भारतातून येतात, पण भारतीय क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंची उंची रवी शास्त्रीपेक्षा (Ravi Shastri) खूप जास्त आहे, त्यामुळे विराटला स्वत:चा निर्णय घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही,' असं कनेरियाने सांगितलं. 'रवी शास्त्री विराटला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे, पण राहुल द्रविडसोबत असं होऊ शकत नाही. कोहलीला द्रविडचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागेल. दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. कोहली आणि द्रविडची जोडी जमणार नाही, हे मी आधीपासूनच सांगितलं होतं आणि तसंच झालं आहे. रोहितला वनडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. काही काळानंतर विराटकडून टेस्ट टीमची कॅप्टन्सीही काढून घेतली जाईल. रोहित किंवा केएल राहुल टेस्ट टीमचे कॅप्टन होऊ शकतात, पण रोहितचा दावा सध्या मजबूत आहे,' असं वक्तव्य कनेरियाने केलं. 'भले विराटला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही, पण त्याचं कर्णधार म्हणून रेकॉर्ड शानदार आहे. रन बनवण्यासोबतच त्याने भारताला अनेक मॅच जिंकवूनही दिल्या आहेत. त्याला इज्जत मिळायला पाहिजे होती. तो भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आहे,' असं कनेरियाला वाटतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या