IPL 2019 : अखेर रोहितला आली सद्बुद्धी, करणार ‘या’ जागी फलंदाजी

IPL 2019 : अखेर रोहितला आली सद्बुद्धी, करणार ‘या’ जागी फलंदाजी

आयपीएल 2018मध्ये रोहितने आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत अनेकदा बदल केले. याचा परिणाम रोहितच्या खेळावर झाला होता, त्यामुळे यंदा आधीच सावधगिरी बाळगतं रोहितनं घेतला हा निर्णय.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सुरुवात होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या हंगामात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फलंदाजी करणारा रोहित यंदाच्या हंगामात सामन्याची सुरुवात करत, सलामीला फलंदाजीकरीता उतरणार आहे. या संदर्भात मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत रोहितनं अधिकृत घोषणा केली.

आयपीएल 2018मध्ये रोहितने आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत अनेकदा बदल केले. याचा परिणाम रोहितच्या खेळावर झाला होता, त्यामुळे यंदा आधीच सावधगिरी बाळगतं, रोहितनं आयपीएलच्या सुरुवातीलाच ओपनिंगला फलंदाजी करणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन वर्षात मुंबई संघासाठी सलामीचे फलंदाज ही मोठ कसोटी होती, कारण मुंबईसाठी कोणतीच समीकरणं यशस्वी होतं नव्हता. 11व्या हंगामात मुंबईकरीता सुर्यकुमार यादव, इवन लुइस किंवा कधीकधी अगदी विकेटकिपर ईशान किशनलाही ओपनिंगला उतरविले होते. यामुळे रोहित तिसरा आणि चौथ्या स्थानावर फलंदाजी केली होती.

2018च्या आयपीएल रोहित करीता सर्वात खराब आयपीएल हंगाम ठरला. या हंगामात रोहितने 23.83च्या सरासरीने केवळ 286 धावा केल्या होत्या, ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यात ओपनिंग करणारा रोहित आता आयपीएमध्ये ओपन करणार असल्यामुळे मुंबईला काहीअंशी चांगले दिवस येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. आयपीएलच्या या 12व्या हंगामात मुंबईचे एकूण 14 सामने होतील, ज्यातील पहिला सामना रविवारी दिल्ली विरोधात होणार आहे.

===============================================================================================================================

VIDEO : आगे आगे देखिए होता है क्या? मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading