• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • संकटात साथ देणारा मुंबईकर! रोहितच्या त्या निर्णयामुळे अजिंक्य रहाणेला जीवनदान

संकटात साथ देणारा मुंबईकर! रोहितच्या त्या निर्णयामुळे अजिंक्य रहाणेला जीवनदान

Rohit Sharma

Rohit Sharma

विराट कोहली पोठोपाठ रोहित शर्मानेदेखील (Rohit Sharma )विश्रांती मागितल्यामुळे बीसीसीआयच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: न्यूझीलंडचा भारत दौरा १७ नोव्हेंबरपासून (india vs new zealand test series) सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिली 3 T20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच विराट कोहली पोठोपाठ रोहित शर्मानेदेखील(Rohit Sharma) विश्रांती मागितल्यामुळे बीसीसीआयच्या (BCCI) डोकेदुखीत वाढ झाली आहे. बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्माची कर्णधारपदी निवड झाली आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. याचे कारण म्हणजे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित किंवा अजिंक्य रहाणे यांच्यापैकी कोणाला कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवायचे याचा निर्णय अद्याप निवडकर्त्यांना घेता आलेला नाही. अशातच बीसीआयसमोर नवी समस्या येऊन उभी ठाकली आहे. रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता टेस्ट सिरीज कॅप्टन म्हणून सर्वांच्या नजरा रोहित शर्माकडे वळल्या आहेत. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्माने विश्रांतीची मागणी केली आहे. पहिल्या कसोटीदरम्यान विराट कोहलीही सुट्टीवर आहे. अशा स्थितीत कर्णधाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. कोहली संघात नसताना तो कसोटीत कर्णधार असतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली होती. मात्र आता रहाणेऐवजी रोहितला उपकर्णधार बनवण्याचा विचार निवडकर्ते करत आहेत. अशा स्थितीत रोहितकडे कर्णधारपद मिळेल, असे बोलले जात होते. पण त्याच्या विश्रांतीच्या मागणीमुळे रहाणे हा एकच पर्याय उरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाईल. रोहित आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कानपूर कसोटीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. विराट दुसऱ्या कसोटीसाठी पुनरागमन करेल. त्यामुळे कर्णधारपदही त्याच्याकडे येणार आहे. न्यूझीलंडमधील मालिका पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भारताला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. हा दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. भारताने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा स्थितीत टीम इंडिया या दौऱ्यावर पूर्ण ताकदीनिशी उतरेल.
  Published by:Dhanshri Otari
  First published: