विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

विराट-रोहितमधील मतभेद टोकाला, हिटमॅनने अनुष्काच्या माध्यमातून असा काढला राग

वर्ल्ड कपनंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्याच मतभेद असल्याच्या चर्चा वाढू लागल्या. त्यानंतर विराट कोहलीचे कर्णधारपद काढून रोहित शर्माला द्यावे, अशी मागणी जोर धरत होती. आता मात्र रोहित-विराट यांच्यातील मतभेद टोकाला गेले असल्याची माहिती मिळत आहे.

प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार, रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे. रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.

त्यामुळं आता रोहित-विराट यांच्यातील वाद आता मैदानाबाहेरही पोहचला आहे. दरम्यान 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे. याकरिता कर्णधार म्हणून विराट कोहलीला कायम ठेवण्यात आले आहे.

वाचा-षटकार तर सोडा, एक चौकारही लगावता आला नाही युवराजला!

कर्णधारपद धोक्यात आल्यानं विराट जाणार वेस्ट इंडिजला

भारताला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर संघासह विराट कोहलीवर टीका करण्यात आली. त्यापूर्वी विराट विंडीज दौऱ्यानंतर विश्रांती घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, वर्ल्ड कपनंतर अचानक विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी विराट तयार झाला. कर्णधारपद धोक्यात येऊ नये म्हणून विराट विंडीज दौऱ्यावर जात असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यामागचं सत्य वेगळंच आहे. विराट कोहलीने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला कारण वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय खेळाडूं निराश झाले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मनोबल उंचावणं गरजेचं असल्याची माहिती सूत्रांनी timesnownews.com ला दिली आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे. अशा कठीण परिस्थिती संघाला सोडून नाही जाऊ शकत. आपल्यावरील जबाबदारी समजून घेऊन विराटने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला.

वाचा-...म्हणून फलंदाजांची झोप उडवणारा मलिंगा 10 वर्षात घरी गेलाच नाही!

SPECIAL REPORT: विचित्र आवाज करणाऱ्या यंत्राचा VIDEO व्हायरल, 'हे' आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या