‘मग IPL कधी सोडतोयस?’ इको फ्रेंडली दिवाळीचा संदेश देणारा रोहित झाला ट्रोल

‘मग IPL कधी सोडतोयस?’ इको फ्रेंडली दिवाळीचा संदेश देणारा रोहित झाला ट्रोल

चाहत्यांना दिवाळी कशी साजरी करावी, असे सांगणाऱ्या रोहितला चाहत्यांनी केलं ट्रोल.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळीचा सण म्हटलं की रोषणाई, आनंद आणि फटाके. मात्र गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी केली जाते. मुंबईत यंदात दिवाळीत गेल्या पाच वर्षांनंतर शुध्द हवा पाहायला मिळाली. तर, दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यामुळं यंदाची दिवाळी ही पर्यावरणपूरक असावी, यासाठी खेळाडूंनीही पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, भारताचा सलामीचा फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने देखील दिवाळीच्या शुभेच्छा दे, फटाके फोडू नका, असा सल्ला चाहत्यांना दिला आहे. मात्र रोहितच्या या सल्ल्याला चाहत्यांनी ट्रोल केले आहे.

इतर खेळाडूंप्रमाणे रोहितनं दिवाळीच्या फटाक्यांमुळे कुत्र्यांना त्रास होत आहे. कुत्रे घाबरतात, असा संदेश देत, “सर्व भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी अपेक्षा करतो की ही दिवाळी तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. दिव्यांसोबत पटाके फोडताना यांची काळजी घ्या. त्यांना भितीनं असे पाहणे गंभीर आहे”, असे म्हणत घाबरलेल्या कुत्र्यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या पोस्टवर चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी आयपीएलमध्ये वाजणाऱ्या फटाक्यांचा व्हिडीओ पोस्ट करत, मग आयपीएल कधी सोडतोयस असा सवाल केला.

दरम्यान, भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मानं वर्ल्ड कपपासून चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळं बांगलादेश विरोधात सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत कर्णधारपद रोहित शर्माला दिले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी मालिकेतही रोहित शर्माचे वेगळे रूप पाहायला मिळाले. कसोटीमध्ये पहिल्यांदाच सलामीचा फलंदाजी करणाऱ्या रोहितनं या मालिकेत मालिकावीराचा मान मिळवला.

First published: October 28, 2019, 5:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading