'पोझ कमी कर आणि थोडी बॅटिंग कर', मुंबईकर क्रिकेटपटूनं घेतली पुणेकराची फिरकी

'पोझ कमी कर आणि थोडी बॅटिंग कर', मुंबईकर क्रिकेटपटूनं घेतली पुणेकराची फिरकी

सोशल मीडियावर व्हायरल होत मुंबईकर-पुणेकराचं भांडण.

  • Share this:

हैदराबाद, 05 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज 6 डिसेंबरपासूनपासून टी-20 मालिका सुरू होत आहे. यातील पहिला सामना हैदराबाद येथे होणार आहे. एकीकडे पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघ बांधणीची तयारी सुरू आहे. यात युवा खेळाडूंना संधी मिळाल्यामुळे काही खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. यात केदार जाधव या खेळाडूचाही समावेश आहे. वर्ल्ड कपनंतर केदार जाधवला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू टीम इंडिया बाहेर असला तरी त्याला रणजी संघात संधी मिळाली आहे. 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत केदार महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या महिन्यांपासून केदार फलंदाजी करताना संघर्ष करत आहे. अनेक दिवसांपासून मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडीजविरुद्ध त्याला पुन्हा एकदा त्याची लय परत मिळवण्याची संधी असेल. तसेच 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही केदार महाराष्ट्राकडून खेळताना दिसेल.

वाचा-LIVE सामन्यात गोलंदाज झाला जादूगार! चेंडूनं नाही तर रुमालानं केली कमाल

 

View this post on Instagram

 

Feels good to be back on the field and do what I like to do. 🏏🙂 #ranjitrophy @sareen_sports

A post shared by Kedar Jadhav (@kedarjadhavofficial) on

वाचा-विश्वास बसणार नाही; टी-20मध्ये के.एल.राहुल मोडणार विराटचा विक्रम

रणजी करंडकसाठी केदार सध्या सराव करत असून त्यानं चष्मा घातलेला एक डॅशिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला केदारने कॅप्शन दिले आहे की ‘मैदानावर परत येऊन आणि मला जे आवडते ते करताना छान वाटत आहे.’ पण भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मात्र केदारच्या या पोस्टवर त्याची फिरकी घेत. केदारला ट्रोल करत रोहितनं या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे की ‘पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा (पोज कमी कर आणि थोडी फलंदाजी कर).’

वाचा-ICCचा नवा गेमचेंजर नियम, पहिल्या टी-20 सामन्यात होणार ट्रायल

रोहित अनेकदा केदारच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळं पुन्हा एकदा सोशल मीडियावर मुंबईकर रोहित आणि पुणेकर केदार यांच्यात मजेशीर संभाषण झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, रोहित शर्मा भारत-वेस्ट इंडिज दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 5, 2019, 6:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading