IPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा !

आज दिल्लीचा संघ मुंबई विरोधात भिडणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा हा विक्रम करु शकतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 06:44 PM IST

IPL 2019 : 'या’ विक्रमासाठी रोहितला हव्यात केवळ 12 धावा  !

नवी दिल्ली, 18 एप्रिल : मुंबई इंडियन्सच संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज दिल्ली कॅपिटल्स संघा विरोधात दिल्लीच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. दरम्यान हा सामना मुंबईला आपल्या आधीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीची चांगली संधी असणार आहे. त्यामुळं हा सामना खुप महत्त्वाचा असणार आहे.

दरम्यान दुखापतीतुन सावरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्यात आपल्या नावावर आणखी एक विक्रम करण्यास सज्ज आहे. टी-20मध्ये 8 हजार धावा पुर्ण करण्यासाठी रोहितला केवळ 12 धावांची गरज आहे. जर, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रोहितनं 12 धावा पुर्ण केल्या तर, तो भारताचा तिसरा फलंदाज असेल, ज्यानं टी-20मध्ये 8 हजार धावा पुर्ण केल्या आहेत. त्याच्या आधी सुरेश रैना (8216) आणि विराट कोहली (8183) यांनी हा पराक्रम केला आहे.

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मानं आतापर्यंत 306 सामन्यात 45च्या सरासरीनं 7988 धावा केल्या आहेत. यात 118 ही त्याची टी-20मधली सर्वोत्तम खेळी आहे. रोहितनं भारताकडून सर्वात जास्त म्हणजे 6 शतक आणि 53 अर्धशतक ठोकले आहेत.

ख्रिस गेल आहे नंबर वन

टी-20 क्रिकेटमध्ये सध्या तरी केवळ एकाच फलंदाजाचे अधिराज्य आहे. तो म्हणजे युनिवर्सल बॉस ख्रिस गेल. त्याच्या नावावर 379 सामन्यात 12 हजार 670 धावांचा विक्रम आहे. यासह तो पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20मध्ये 10 हजार धावांचा आकडा पार करणारा गेल हा एकमेव फलंदाज आहे. तर, दुसऱ्या नंबर वर न्युझीलंडचा फलंदाज ब्रॅन्डन मॅक्युलम आहे. त्यानं 9922 धावा केल्या आहेत.

Loading...


त्यामुळं आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या 12 धावांनी तो 8 हजार धावांचा आकडा पार करेल. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून, त्यांनी मागील तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र, सामन्याआधीच दिल्लीला एक झटका बसला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला आहे, त्यामुळं आजचा सामना तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. बुधवारी सरावादरम्यान श्रेयसच्या हताला दुखापत झाली आहे. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 266 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाची कामगिरी या पर्वात म्हणावी तशी झालेली नाही. मुंबईला गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर एका समान्यात पराभव स्विकारावा लागला.याआधी कोटलाच्या खेळपट्टीबद्दल दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि पृथ्वी शॉ या दोघांनीही नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पूरक करण्याची शक्यता कमी आहे.VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...