मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Rohit Sharmaच होणार टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार; T20 World Cup नंतर होणार घोषणा- सूत्र

Rohit Sharmaच होणार टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार; T20 World Cup नंतर होणार घोषणा- सूत्र

Rohit Sharma

Rohit Sharma

टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup ) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी 20 संघाचे (Virat Kohli) नेतृत्व सोडणार आहे. विराटच्या या निर्णयानंतर इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहिच शर्मा(Rohit Sharma) असेल अशी अटकळ क्रिकेट जगतात बांधली जात आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: युएईत होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup ) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी 20 संघाचे (Virat Kohli) नेतृत्व सोडणार आहे. विराटच्या या निर्णयानंतर इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहिच शर्मा(Rohit Sharma T-20 Captain of Indian Team ) असेल अशी अटकळ क्रिकेट जगतात बांधली जात आहे. तर आता या सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळला आहे असे म्हणायला हरकत नाही.

बीसीसीआयने विराट नंतर टी-20 संघाचा कर्णधार कोण असेल हे अद्याप जाहिर केलेले नाही. परंतु, सुत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माच इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार असणार आहे. हे पद कोण सांभाळणार हे गुपित नाही. रोहित शर्मा नेतृत्व गटात आहे. आणि टी -20 विश्वचषकानंतर तो विराटकडून पदभार स्वीकारेल. असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितल आहे.

T20 World Cup IND vs AUS LIVE : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात

मैदानाबाहेर नेहमीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू असते. विजयाच्या टक्केवारीचा विचार करता वनडेत 70.43 तर टी-20 मध्ये 67.44अशी विराटची कामगिरी आहे. तर रोहित शर्माची टक्केवारी अनुक्रमे 80 आणि 78.94 इतकी आहे. या सोबत रोहितने मुंबई इंडियन्सला एक दोन नव्हे तर तब्बल पाच विजेतेपद मिळवून दिली आहेत.

तसेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 पैकी 14 सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 वर्ल्डकपनंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली कर्णधार असेल

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे स्पष्ट केले आहे की, तो वनडे आणि कसोटीत भारताच्या कर्णधारपदी तो कायम राहील. त्याने रोहितला टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधार करण्याचं सुचवलं आहे. त्याने रोहितच्या नेतृत्व गुणवत्तेचीही प्रशंसा केली.

...म्हणून Washington Sundar ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून नाव घेतले मागे

युएईमध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि 24 ऑक्टोबरला भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे.

First published:

Tags: Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup, Virat kohli