मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारतीय टी-20 संघाची धुरा रोहित शर्माकडे? विराट कोहलीनं दिले संकेत

भारतीय टी-20 संघाची धुरा रोहित शर्माकडे? विराट कोहलीनं दिले संकेत

टी-20 वर्ल्ड कपमध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) टॉससाठी मैदानात उतरला. तेव्हा विराटने नवीन कॅप्टनच्या नावाबाबत संकेत दिले.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) टॉससाठी मैदानात उतरला. तेव्हा विराटने नवीन कॅप्टनच्या नावाबाबत संकेत दिले.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) टॉससाठी मैदानात उतरला. तेव्हा विराटने नवीन कॅप्टनच्या नावाबाबत संकेत दिले.

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर:  सध्या युएईमध्ये (UAE) टी-20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup) क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. टीम इंडियाने सोमवारी 8 नोव्हेंबर 2021ला औपचारिकता म्हणून स्पर्धेतील आपली अखेरची मॅच खेळली. नामिबियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतानं 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ही मॅच भारतासाठी आणि विशेषत: विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास होती. विराट कोहली कॅप्टन म्हणून शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळत होता. विराट कोहलीनंतर भारतीय टी-20 संघाची धुरा कुणाच्या हातात जाईल, याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. मॅचपूर्वी टॉसच्यावेळी बोलताना विराट कोहलीनं नवीन कॅप्टनच्या (Captain) नावाबाबत संकेत दिले आहेत. याशिवाय भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची मिळालेली संधी, ही नक्कीच अभिमानास्पद बाब होती, असंही कोहली म्हणाला.

    टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीनं या स्पर्धेनंतर कॅप्टनचं पद सोडण्याची घोषणा केली होती. दुर्दैवानं त्याची कॅप्टन म्हणून शेवटची स्पर्धा भारतीय टीम आणि त्याच्यासाठी खास ठरली नाही. भारतीय टीम ग्रुप स्टेजमधूनचं बाहेर पडली आहे. विराटनं नामिबियाविरुद्ध कॅप्टन म्हणून आपला शेवटची मॅच खेळली. कॅप्टन म्हणून विराटची ही 50वी टी-20 मॅच होती. मॅचपूर्वी विराटने आपल्या कॅप्टनशीपमधील अनुभव सांगितले.

    'कॅप्टनची जी जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती, ती पूर्ण करण्याचं काम मी केलं आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या नेतृत्वात टीमनं केलेल्या कामगिरीचादेखील मला अभिमान आहे. मात्र, कॅप्टनपद सोडून भविष्याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे,' अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली. ‘आता नवीन खेळाडूंनी संघाला पुढे नेण्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासोबत रोहित शर्माही (Rohit Sharma) आहे. गेल्या काही काळापासून तो सर्व जबाबदाऱ्या पाहत आहे. संघात अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे लीडरशीप क्वॉलिटी आहे. त्यामुळे येणारा काळ भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगला आहे,’ असंही कोहली म्हणाला.

    टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर बीसीसीआय टी-20 फॉरमॅटच्या नव्या कॅप्टनची घोषणा करू शकते, असं म्हटलं जात आहे. या शर्यतीमध्ये रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय विराट कोहलीचं वन-डे संघाचं कॅप्टनपदही जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. असं झाल्यास वन-डे संघासाठी वेगळा कॅप्टन आणि कसोटी संघासाठी वेगळा कॅप्टन असेल. विराट कोहलीकडे कसोटी संघाचं कॅप्टनपद कायम ठेवलं जाईल, अशा चर्चा आहेत. विराट कोहलीसोबतच भारतीय टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचीदेखील सोमवारी शेवटची मॅच होती. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपनंतर माजी कॅप्टन आणि क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचे नवे मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहेत.

    दरम्यान, सोमवारी भारतविरुद्ध नामिबिया टी-20 मॅच झाली. दोन्ही टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्या आहेत. या मॅचमध्ये भारतानं नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. टॉस जिंकून कॅप्टन विराट कोहलीनं नामिबियाला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं होतं. 20 ओव्हर्समध्ये नामिबियानं 8 गड्यांच्या बदल्यात 132 रन्स केल्या. 133 रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टीमनं 15.2 ओव्हर्समध्येच 135 रन्स करत विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा (56) आणि केएल राहुल (54) या दोघांनीही अर्धशतकं झळकवली.

    First published:

    Tags: Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup, Virat kohli