कुलदीप, चहलसाठी केली होती तयारी, जाधवने खेळ फिरवला- सरफराज

कुलदीप, चहलसाठी केली होती तयारी, जाधवने खेळ फिरवला- सरफराज

पहिल्या पाच ओवरमध्ये दोन विकेट गमावणं आमच्या टीमला भारी पडलं

  • Share this:

भारताने एशिया कपमध्ये पाकिस्तानवर आठ गडी राखून एकतर्फी सामना जिंकला. या सामन्यावर सुरूवातीपासूनच भारताची पकड होती. या विजयाबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, हाँगकाँगविरुद्ध सामन्यावेळी खेळताना ज्या चुका झाल्या त्या आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळताना होऊ दिल्या नाहीत. या विजयाचं सारं श्रेय गोलंदाजांना जातं.

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला संघर्ष करावा लागला होता. मात्र पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने एकहाती जिंकला. रोहितने सामन्यानंतर म्हटले की, ‘सामन्याच्या सुरूवातीपासूनच आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने खेळलो. हाँगकाँगविरुद्ध खेळताना ज्या चुका केल्या त्या आम्ही कटाक्षाने टाळल्या. शिवाय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. आम्ही जसं प्लॅनिंग केलं होतं, त्याचनुसार खेळलो. स्पिनर्सनी चांगली गोलंदाजी केली. त्यांची फलंदाजी चांगली आहे, त्यामुळे शक्य तितक्या लवकर पहिल्या दोन विकेट घेणं आवश्यक होतं. जेव्हा बाबर आजम आणि शोएब मलिक फलंदाजी करत होते, तेव्हाही आम्ही नेटाने उत्तम गोलंदाजी करण्याकडे भर दिला.’

यानंतर रोहितने केदारचं कौतुक करताना म्हटलं की, 'केदार सध्या त्याच्या गोलंदाजीवर काम करत असीन, गोलंदाजीला तो फार गंभीरपणे घेत आहे. त्याने ज्या विकेट घेतल्या त्या आमच्यासाठी बोनस होत्या. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतरच्या मधल्या ओवर महत्त्वपूर्ण होत्या.'

फलंदाजांवर भडकला पाकिस्तानचा कर्णधार

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने सांगितले की, 'पहिल्या पाच ओवरमध्ये दोन विकेट गमावणं आमच्या टीमला भारी पडलं. सरफरजने या अपयशात फलंदाजांना दोषी ठरवले. सरफराज म्हणाला की, आमची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या पाच ओवरमध्ये आम्ही दोन विकेट गमावल्या. त्यानंतरही विकेट जातच राहिल्या त्यामुळे सामन्यात पुनरागमन करू शकलो नाही.'

जाधवविरोधात कोणतीच तयारी केली नाही

जाधवबद्दल बोलताना सरफराज म्हणाला की, 'बाबर आजमला सोडून आम्ही सगळेच वीकेट पटापट गमावले. भविष्यात कशी फलंदाजी करायला हवी याचा आता आम्हाला विचार करायला हवा. आम्ही कुलदीप आणि चहल या दोन स्पिनरसाठी तयारी केली होती. पण तिसऱ्या स्पिनरने (जाधव) आमच्या वीकेट घेतल्या.' पाकिस्तानच्या सलामी जोडीसह तीन वीकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ दी मॅचचा किताब देण्यात आला.

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

First published: September 20, 2018, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading