जडेजा-रोहितनं केली बुमराह आणि विराटची मस्करी, VIDEO VIRAL

विराट जडेजा आणि रोहित मस्करी करत असताना लांबून त्यांच्या कुरापती पाहत होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 05:03 PM IST

जडेजा-रोहितनं केली बुमराह आणि विराटची मस्करी, VIDEO VIRAL

गयाना, 09 ऑगस्ट : वर्ल्ड कपनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरू झाले होते. दरम्यान विराटनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी या सगळ्या अफवा असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचीच मस्करी करताना जडेजा आणि रोहित दिसत आहेत.

सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघानं टी-20 मालिका आपल्या खिशात घातली. यात रोहित शर्मानं अर्धशतकी कामगिरी करत, भारताला मालिका मिळवून दिली. दरम्यान, एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात रवींद्र जडेजा-रोहित शर्मा हे दोघे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची मस्करी करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा व रवींद्र जडेजा हॅड्स अप असा गेम खेळत आहेत. यामध्ये रोहितनं कार्ड न बघता जडेजाला दाखवत आहे. त्यात जडेजा इशाऱ्यामध्ये त्या कार्डवर काय लिहिले आहे हे रोहितला समजविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावर रोहित शर्मा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये विराट कोहलीसह, जसप्रीत बुमराह यांची अ‍ॅक्टींग करताना दिसला. जडेजानं कोहलीच्या बॅटिंगची तर, बुमराहच्या गोलंदाजीची अ‍ॅक्टींग करत आहे.

लांबून कोहली पाहत होता रोहित-जडेजाच्या कुरापती

Loading...

हा गेम सुरू असताना कोहली लांब बसून जडेजा आणि रोहित यांच्या कुरापती पाहात होता. मात्र रोहितचा अंदाज पाहून विराट कोहली कोपऱ्यात बसून हसत होता. दरम्यान याआधी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीला उपस्थित राहतानासुद्धा विराट सर्वांना भेटला होता. मात्र, त्यानं रोहित शर्माकडे न पाहताच निघून गेल्यानं दुराव्याची चर्चा सुरू झाली होती.

बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...