सुपर ओव्हरमध्ये कोणाच्या चुकीमुळे घडला चमत्कार? रोहित शर्माने केला खुलासा

सुपर ओव्हरमध्ये कोणाच्या चुकीमुळे घडला चमत्कार? रोहित शर्माने केला खुलासा

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये मारलेल्या दोन षटकारांमागचं रहस्य उलगडलं आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 29 जानेवारी : न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसऱा टी20 सामना सुपर ओव्हरमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या  असताना भारताचा फलंदाज रोहित शर्माने षटकार खेचून धमाकेदार विजय मिळवून दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 179 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडला 6 बाद 179 धावाच करता आल्या.

सुपर ओव्हरमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना 17 धावा दिल्या. त्यानंतर न्यूझीलंडकडून टीम साउथीने गोलंदाजी केली. न्यूझीलंडने एका षटकात 18 धावांचे आव्हान भारताला दिले. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीला आले होते. न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साउथीने गोलंदाजी केली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि दुसऱ्या चेंडूवर फक्त एकच धाव काढता आली. त्यानंतर केएल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. त्यावेळी भारताला तीन चेंडूत 11 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर केएल राहुलने एक धाव काढली. पाचव्या चेंडूवर रोहितने षटकार मारल्यानंतर भारताला अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. रोहित शर्माने षटकार मारून विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मान म्हणाला की, सुरुवातीपासून फटकेबाजी करायची की एकेरी दुहेरी धावा काढायच्या असा प्रश्न माझ्यासमोर होता. त्याऐवजी मी गोलंदाज चूक करेपर्यंत वाट पाहण्याचं ठरवलं आणि गोलंदाजाने चूक करताच त्याचा फायदा घेतला असा खुलासा रोहित शर्माने केला. पहिल्या दोन सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे संघाच्या असलेल्या अपेक्षा या सामन्यात पूर्ण करता आल्याचं रोहित म्हणाला.

ऐतिहासिक विक्रम रचत युवा ब्रिगेडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट

भारतानं दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि मुनरो यांनी 47 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रवींद्र जडेजानं 6व्या ओव्हरमध्ये भारताला पहिले यश मिळवून दिले. मार्टिग गुप्टिल 31 धावांवर बाद झाल्यानंतर केन मैदानात आला. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. केनने एकट्यानं न्यूझीलंडचा डाव सावरला. भारताकडून रवींद्र जडेजानं 2 विकेट घेत भारताच्या विजयासाठी प्रयत्न केला. थरारक सामन्यात मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात दोन विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला.

वाचा : विल्यम्सनच्या एका निर्णयामुळे सुपर ओव्हरआधीच नक्की झाला होता भारताचा विजय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 29, 2020 08:30 PM IST

ताज्या बातम्या