मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टी-20 वनडे टीमचा कॅप्टन, टेस्ट टीमचा उपकर्णधार, हिटमॅन रोहितला मिळाली आणखी एक जबाबदारी!

टी-20 वनडे टीमचा कॅप्टन, टेस्ट टीमचा उपकर्णधार, हिटमॅन रोहितला मिळाली आणखी एक जबाबदारी!

Photo-BCCI

Photo-BCCI

टीम इंडियाचा (Team India) हिटमॅन म्हणून ओळख मिळवलेल्या रोहित शर्मावर (Rohit Sharma) मागच्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत.

  • Published by:  Shreyas

बंगळुरू, 17 डिसेंबर : टीम इंडियाचा (Team India) हिटमॅन म्हणून ओळख मिळवलेल्या रोहित शर्मावर (Rohit Sharma) मागच्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडली, यानंतर रोहितला कर्णधार करण्यात आलं. तसंच विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवत रोहितला या फॉरमॅटचं नेतृत्वही देण्यात आलं. सोबतच अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) टेस्ट टीमचं उपकर्णधारपद काढून रोहितला देण्यात आलं. मागच्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या या प्रमोशननंतर रोहित शर्मा आणखी एका वेगळ्याच भूमिकेत दिसला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना व्हायच्या अवघे काही दिवस आधी रोहित शर्माला मुंबईमध्ये सराव करताना मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. या दुखापतीमुळे रोहित टेस्ट टीममधून बाहेर झाला. या दुखापतीतून उपचार घेण्यासाठी आणि फिट होण्यासाठी रोहित बंगळुरूच्या एनसीए (NCA) अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला आहे. भारताची अंडर-19 टीमही (Under-19 Team) सध्या एनसीएमध्येच आहे. रोहित शर्माने या युवा खेळाडूंसोबत वेळ घालवला आणि त्यांना क्रिकेटचे महत्त्वाचे सल्ले दिले.

बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माने घेतलेल्या खेळाडूंच्या शाळेचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी (Under-19 Asia Cup) भारताची अंडर-19 टीम युएईला रवाना होणार आहे, त्याआधी रोहितने या खेळाडूंना खेळाचे बारकावे समजावून सांगितले.

दरम्यान रोहित शर्माला फिट होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्माऐवजी भारतीय ए टीमचा कर्णधार प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याला टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. पण दक्षिण आफ्रिकेत पहिल्या टेस्टमध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोघंच ओपनिंग करतील. 26 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडेसाठी फिट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताकडून रोहित शर्माने 10 वनडेमध्ये कॅप्टन्सी केली आहे, यातल्या 8 मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.

First published: