धवनला झोपेत बडबडण्याची सवय? रोहितने शेअर केला VIDEO

धवनला झोपेत बडबडण्याची सवय? रोहितने शेअर केला VIDEO

रोहित आणि शिखरची मजेशीर जुगलबंदीची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

  • Share this:

बंगुळुरू, 21 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत असलेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-0ने आघाडी मिळवली आहे. दरम्यान, भारत आणि अफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना रविवारी 22 सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी मैदानावर होणार आहे. यासाठी भारतीय संघ बंगुळुरूला गुरुवारी रवाना झाला.

पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर दुसरा सामन्यात भारताने 7 विकेटने सोपा विजय मिळवला. तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ जोमाने सराव करत आहे. यासगळ्यात सोशल मीडियावर धवन आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. भारताचे सलामीचे फलंदाज सध्या सोशल मीडियावर एकमेकांविरोधात व्हिडिओ शेअर करत आहेत.

रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धवनचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये शिखर एकटाच बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

No no he isn’t talking to me! And he’s too old to have an imaginary friend. Why so loco jattji ‍♂️‍♂️ @shikhardofficial

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

वाचा-140 दिवसात बदललं जोफ्रा आर्चरचं नशीब, विराट कोहलीपेक्षा जास्त पगार

रोहितने हा व्हिडिओ पोस्ट करताना, "नाही,नाही..शिखर माझ्याशी बोलत नाही आहे. त्याचा एक काल्पनिक मित्र आहे. त्या मित्राशी कदाचित संवाद साधत आहे. त्याच वय झालं आहे, त्यामुळे असं होत आहे. का एवढे वेडे झाले आहेत जट्ट जी", असे कॅपशन लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने धवनला टॅगही केले आहे. या व्हिडिओवर शिखरने, "मी शायरीची प्रॅक्टिस करत होतो आणि या महाशयांनी व्हिडिओ केला. मनापासून काही तरी आठवत होतो, मज्जा आली. असा अभ्यास जमला असता तर...", असे उत्तर दिले आहे. या व्हिडिओवर युवराज सिंग, शार्दूल ठाकूर यांनीही कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Meet the loving and caring fathers from our team @rohitsharma45 & @royalnavghan

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

वाचा-कॅप्टन कुल धोनीच्या घरी कित्येक दिवस लाईटच नाही, रागात साक्षी म्हणाली...

याआधी शिखरनं रोहित शर्माचा आपली मुलगी समायरासाठी खरेदी केलेली खेळणी आणि त्यासोबत रोहित कसा मोठा झाला आहे, असा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्टवर जडेजा आणि इतर खेळाडूंनी मजेशीर कमेंट केल्या होत्या. त्यानंतर याच व्हिडिओचा बदला म्हणून रोहितनं धवनचा व्हिडिओ शेअर केला असावा.

वाचा-पाकसोबत कुणी येईना खेळायला, आफ्रिदीनं पुन्हा ओकली भारताबद्दल गरळ!

VIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 08:48 AM IST

ताज्या बातम्या