मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : रोहितला करायची आहे इतिहासाची पुनरावृत्ती, सूर्याही साथ द्यायला तयार!

T20 World Cup : रोहितला करायची आहे इतिहासाची पुनरावृत्ती, सूर्याही साथ द्यायला तयार!

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 2007 साली घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी आपण तयार असल्याचं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 सप्टेंबर : 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 2007 साली घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी आपण तयार असल्याचं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे. भारताने 2007 साली एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित शर्मा त्या टीमचा भाग होता. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली. या पोस्टमध्ये त्याने 2007 वर्ल्ड कप विजयाचा फोटो वापरला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही या फोटोवर कमेंट केली आहे.

'या टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक जण इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावेल. आम्ही यासाठी येत आहोत, जिंकण्यासाठी येत आहे. 24 सप्टेंबर 2007, जोहान्सबर्ग. याच दिवशी 100 कोटी लोकांचं स्वप्न सत्यात उतरलं. कमी अनुभव असलेली टीम इतिहास घडवेल, असं कोणाला वाटलंही नव्हतं,' असं रोहित त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.

'14 वर्ष होऊन गेली, आम्ही बराच प्रवास केला. आणखी इतिहास घडवले, आम्हाला धक्के लागले, पण आम्ही धैर्य गमावलं नाही, कारण आम्ही कधीच पराभव मान्य केला नाही. आम्ही झोकून दिलं,' अशी पोस्ट रोहितने केली.

रोहित शर्माची ही पोस्ट चाहत्यांना फारच आवडली, तसंच सूर्यकुमार यादवनेही यावर कमेंट केली. तुझ्यासोबत बॉल स्टेडियमबाहेर पोहोचवण्याची वाट पाहत आहे, एकत्र येऊन पुन्हा इतिहास घडवू, असं सूर्या रोहितच्या पोस्टवर म्हणाला.

रोहित शर्माने 111 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.54 च्या सरासरीने 2,864 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. तर सूर्यकुमार यादवही टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू आहे. आयपीएल, स्थानिक क्रिकेट आणि भारताकडून खेळताना सूर्याने आपली छाप पाडली आहे, पण आयपीएलच्या या मोसमात त्याला संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतण्याचं आव्हान सूर्यकुमार यादवसमोर असेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्या तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळेल. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये होणार आहे.

First published:

Tags: Rohit sharma, Suryakumar yadav, T20 world cup, Team india