Home /News /sport /

विराटनंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण? BCCI ने दीड महिन्याआधीच घेतला होता निर्णय

विराटनंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण? BCCI ने दीड महिन्याआधीच घेतला होता निर्णय

विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमची कॅप्टन्सी (Virat Quits Captaincy) सोडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाल्यानंतर 24 तासांच्या आतच विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमची कॅप्टन्सी (Virat Quits Captaincy) सोडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa)  2-1 ने पराभव झाल्यानंतर 24 तासांच्या आतच विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटने मागच्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडली, यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. आता त्याने टेस्ट टीमचं कर्णधारपदही सोडलं. यानंतर आता भारतीय क्रिकेटमधून विराट युगाचा अस्त झाला आहे. 2014 साली धोनीने टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर विराटला टेस्ट टीमची कॅप्टन्सी देण्यात आली. तर 2017 साली तो वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन झाला. आता विराटने तिन्ही फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यामुळे भारतीय टीममध्ये नव्या युगाला सुरूवात होणार आहे. विराटनंतर आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय टीमची सूत्र जाणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराटने कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माला या फॉरमॅटची कॅप्टन्सी देण्यात आली. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर रोहितलाच कर्णधार करण्यात आलं. तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्याची टेस्ट टीम निवडताना अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) उपकर्णधारपद हटवून रोहितला देण्यात आलं. 8 डिसेंबर 2021 ला ही घोषणा करण्यात आली होती. म्हणजेच दीड महिन्याआधीच विराटचा उत्तराधिकारी कोण, याचा निर्णय बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीने घेतला होता. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहितला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) टेस्ट टीमचं उपकर्णधार आणि वनडे टीमचं कर्णधार करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर राहुल उपकर्णधार असल्यामुळे त्यालाच या टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व देण्यात आलं, पण आता रोहित शर्माचं पुनरागमन झाल्यानंतर तोच भारताच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Kl rahul, Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या