IPL 2019 : रोहित शर्मा वर्ल्ड कपला मुकणार?, भारतीय संघाला मोठा झटका

IPL 2019 : रोहित शर्मा वर्ल्ड कपला मुकणार?, भारतीय संघाला मोठा झटका

आयपीएलच्या यंदाच्या हंगमात विजयाची हॅट्रीक करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज असताना, या सामन्याआधीच मुंबईला एक झटका बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या हंगमात विजयाची हॅट्रीक करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज असताना, या सामन्याआधीच मुंबईला एक झटका बसला आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज असताना, मुंबईच्या संघानं वानखेडेवर जोरदार सराव केला. पण, या सरावात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यासंदर्भात काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितच्या दुखापतीमुळं भारतीय संघाची चिंताही वाढली आहे. एकीकडं आयपीएलची उत्सुकता वाढत आहे, तर दुसरीकडं विश्वचषकासाठी संघ निवडीची लगबग सुरू झाली आहे. त्यातच रोहित शर्माची ही दुखापत मुंबई आणि भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

मुंबई इंडियन्सचा संघ आज किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करणार आहे. मात्र, सराव सत्रात रोहित लंगडत चालताना दिसला. त्यानंतर त्यानं लगेचच सराव सत्रातून विश्रांती घेतली.रोहित धावण्याचा सराव करता त्याचा पाय मुरगळला आणि वेदनेने कळवळत त्याने मैदानावरच लोटांगण घातले. मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्वरीत मैदानावर धाव घेत रोहितवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रोहित ड्रेसिंग रुममध्ये परतला. रोहितच्या दुखपतीबद्दल मुंबई इंडियन्सकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, महत्त्वाच्या स्पर्धेआधी दुखपातग्रस्त होण्याची खेळाडूंची ही पहिली वेळ नाही. याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमहारच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यावेळी वैद्यकीय उपचारानंतर बुमराह मुंबई इंडियन्सच्या चमूत दाखल झाला होता. त्यामुळं आता रोहितची ही दुखापत गंभीर नसावी अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

याआधी भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंना आयपीएलच्या संघ मालकांनी पुरेशी विश्रांती द्यावी असे आदेश बीसीसीआयनं दिले होते. मात्र, बीसीसीआयचे आदेश संघ मालकांकडून आणि खेळाडूंकडून पाळले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

First published: April 10, 2019, 5:05 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading