‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट!

‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरूद्ध टी -20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला श्रीलंकेविरूद्ध टी -20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. असे असले तरी त्याचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवरच आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. त्यामुळं या दोन दौऱ्यांसाठी रोहित शर्मा तयारी करत आहे. दरम्यान, रोहित शर्मानं या दौऱ्याआधी आपल्या निवृत्तीवरही गौप्यस्फोट केला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे रोहित

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा बिझनेसलाईनशी खास संभाषणात, 'न्यूझीलंडमध्ये क्रिकेट खेळणे सोपे नाही. याआधी झालेला दौरा आम्ही 0-1ने गमावला होता. पण आता आपल्याकडे गोलंदाजांची चांगली टीम आहे”, असे सांगितले. तसेच, “नवीन चेंडूने कोठेही फलंदाजी करणे सोपे नाही. अर्थात भारताबाहेर परिस्थिती अधिक कठीण आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत चेंडू ज्या प्रकारे फिरत होता, ते मला भारतात दिसत नाही. विशेषत: पुणे कसोटी सामन्यात चेंडू बरीच स्विंग करीत होता”, असेही रोहित म्हणाला.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपवरून कॅप्टन कोहलीच्याच विरोधात उतरला रोहित शर्मा!

निवृत्तीबाबत रोहितचा गौप्यस्फोट

दरम्यान यावेळी रोहित शर्माला निवृत्तीबाबत विचारले असता, 'मी अद्याप याबद्दल विचार केला नाही, माझ्याकडे जिंकण्यासाठी वर्ल्ड कप आहेत. वर्ल्ड कप जिंकूनच निवृत्त होईल', असे सांगितले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये टी -20 वर्ल्ड कप खेळायचा आहे, ज्यामध्ये प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाचा समावेश आहे. इंग्लंडमधील 2019च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता पण टी -20 मधील त्यांचा प्रवास जिंकल्यानंतरच थांबेल अशी रोहितची इच्छा आहे.

वाचा-धोनी वनडे क्रिकेटमधून लवकरच घेऊ शकतो निवृत्ती, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा

रोहित शर्माचा असा विश्वास आहे की न्यूझीलंडमधील पूर्वीच्या अनुभवातून त्याचा फायदा होईल. रोहित म्हणाला, 'मला काय शिकायला मिळेल ते मला माहित आहे. 2014 मध्ये मी तिथे गेलो. न्यूझीलंडमधील परिस्थिती सोपी नाही परंतु मी आव्हानासाठी सज्ज आहे”. रोहित शर्माने 2013मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले होते पण गेल्या वर्षापासून सलामीची जबाबदारी त्याच्यावर आली.

वाचा-धोनीच्या करिअरवर या खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला,धोनी परतणार नाही!

Published by: Priyanka Gawde
First published: January 9, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading