असं काय झालं की चक्क रोहित शर्मानं मागितली ऋषभ पंतची माफी! VIDEO VIRAL

असं काय झालं की चक्क रोहित शर्मानं मागितली ऋषभ पंतची माफी! VIDEO VIRAL

India vs West Indies : तिसऱ्या सामन्यात ऋषभनं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं.

  • Share this:

गयाना, 07 ऑगस्ट : भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली. भारताचा गोलंदाजी दीपक चाहरनं तीन षटकांत फक्त 4 धावा देत विंडीजचे तीन गडी बाद केले. त्यामुळं या विजयात ऋषभ पंत आणि दीपक चहर यांचे योगदान मोठे होते.

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यातील पहिल्या दोन सामन्यात ऋषभला चांगली कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही सामन्यात खराब शॉर्ट मारत पंत बाद झाला, त्यामुळं लोकांनी त्याच्यावर टीकाही केली होती. मात्र अखेरच्या सामन्यात अर्धशतकी कामगिरी करत कमबॅक केले. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माला चक्क ऋषभ पंतची माफी मागावी लागली.

म्हणून रोहितनं मागितली पंतची माफी!

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यातनं रोहितनं बीसीसीआय टीव्हीवर ऋषभ पंतची मुलाखत घेतली. यावेळी रोहित शर्मानं ऋषभला पंत एवजी संत म्हणून हाक मारली. परंतु आपली चूक मान्य करत रोहितनं मोठ्या मनानं ऋषभची माफी मागितली. यावेळी ऋषभ हसताना दिसला. यावेळी ऋषभनं, "मला ही अर्धशतकी खेळी करून आनंद झाला. दोन सामन्यात धावा करता येत नव्हत्या, त्यामुळं मी निराश होतो. मात्र आता मला आनंद होत आहे की मी चांगली कामगिरी करू शकलो", असे सांगितले.

वाचा-पंतच्या विक्रमी खेळीनंतर विराट कोहलीनं केलं कौतुक

वाचा-चाहर बंधूआधी 'या' भावांच्या जोडीनं गाजवलं क्रिकेटचं मैदान!

विराटनं केले पंतचे कौतुक

पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यानं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. पंतचं कौतुक करताना विराट म्हणाला की, "तो मोठा संघर्ष करून इथंपर्यंत पोहचला आहे. आम्हाला एक चांगला संघ तयार करायचा आहे. टी20 मालिका झाली असून आता एकदिवसीय आणि कसोटीवर आमचे लक्ष आहे", असेही सांगितले.

वाचा- सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

Published by: Akshay Shitole
First published: August 7, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading