मुंबई, 11 डिसेंबर : बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकणार नाही तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा हे मालिकेत खेळणार नाहीत. पहिल्या कसोटी सामन्यात नेतृत्वाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे.
बीसीसीआय़ने बांगलादेश विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलकडे कसोटीचे नेतृत्व सोपवले आहेत. तर कसोटीसाठी रोहितच्या जागी संघात इंडिया ए संघाचा कर्णधार अभिमन्यू इश्वरन याला संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : पाकिस्तानचा फलंदाज सकाळी रुग्णालयातून परतला, दुपारी थेट इंग्लंडविरुद्ध मैदानावर
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भारत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनादकट.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Cricket, Ravindra jadeja, Rohit sharma, Team india