News18 Lokmat

IPL 2019 : पर्दापणात मारला सिक्स...आता मैदानाबाहेर बसला 'हा' खेळाडू

दरम्यान 1514 दिवसांनी पर्दापण करत असताना, पहिल्याच चेंडूत कमाल केली पण पुन्हा त्याला मैदानात बसावं लागलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 04:37 PM IST

IPL 2019 : पर्दापणात मारला सिक्स...आता मैदानाबाहेर बसला 'हा' खेळाडू

मुंबई, 13 एप्रिल : आपलं पहिले काही सामने गमावल्यानंतर पुन्हा विजयीपथावर आलेला मुंबई संघ पंजाब विरोधात पहिल्यांदा कर्णधार रोहित शर्मा शिवाय सामना खेळला. या सामन्यात पोलार्डनं कर्णधारपद भुषवलं आणि तसा खेळलाही. हा सामना मुंबई संघानं अगदी शेवटच्या षटकात जिंकला. पण या सामन्यात आकर्षण ठरला तो, मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार.

रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई संघाला तारण्यासाठी तब्बल 1514 दिवसांनी सिद्धेश लाड मैदानात उतरला. पर्दापणातच, सिद्धेश लाडनं पहिल्याच चेंडूत सिक्सर मारला.


Loading...


पण आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं पुनरागमन केल्यामुळं सिद्धेश लाडला पुन्हा बाहेर बसावं लागलं आहे.सिद्धेशच्या त्या सिक्सवर मात्र, मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा कमालीचा खुश झालेला पाहायला मिळाला. ड्रेसिंग रुममध्ये बसलेला असताना रोहित शर्मानं सिद्धेशच्या या शॉटचं कौतुक केलं. पण सिद्धेश केवळ 15 धावा करत बाद झाला.विशेष म्हणजे सिध्देश लाड हा 2015पासून मुंबई इंडियन्स संघाकडं आहे. याचवेळी हार्दिक पांड्यालाही संघात घेण्यात आले होते. एकीएकडं हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे तर, सिध्देश लाडची हवा आहे ती प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये. विशेष म्हणजे सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेच सिद्धेशला संघाची कॅप दिली होती. सिद्धेश केवळ 15 धावा करत बाद झाला.


VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...