Home /News /sport /

Pull Shot सुधारण्यासाठी चाहत्याने Rohit Sharmaकडे मागितली मदत, 'हिटमॅन'ने दिले हे उत्तर

Pull Shot सुधारण्यासाठी चाहत्याने Rohit Sharmaकडे मागितली मदत, 'हिटमॅन'ने दिले हे उत्तर

Rohit Sharma

Rohit Sharma

रोहित शर्माला (Rohit Sharma ) हाताला दुखापत झाल्याने सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: टेस्ट सीरिजमधल्या पराभवाचा बदला वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa 1st ODI) घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. तर रोहित शर्माला (Rohit Sharma ) हाताला दुखापत झाल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही तो खेळू शकला नाही. सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. अशा परिस्थितही तो आपल्या मार्गदर्शनाची भूमिका चोखपणे बजावत असल्याचा प्रत्यय एका व्हायरल होणाऱ्या ट्विटवरुन आला आहे. क्रिकेट जगतात सध्या त्याच्या ट्विटची आणि चाहत्याने त्याला केलेल्या सवालाची चर्चा रंगली आहे. एक अनुभवी आणि वरिष्ठ भारतीय क्रिकेटर असल्याने, रोहित शर्मा अनेकदा युवा क्रिकेटपटूंना टिप्स देताना दिसतो. काहीदिवसांपूर्वी तो अंडर-19 वर्ल्डकप खेळत असलेल्या भारतीय संघासोबत दिसला होता. खेळाच्या मैदानासह रोहित सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधन्याचा प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे तो चाहत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना रिप्लाय देताना दिसतो. आताही तसेच काहीसे घडले आहे. रोहितच्या एक चाहत्याने रोहितला टॅग करत 'पुल शॉट सुधारण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. जेव्हा मी तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माझी शक्ती कमी पडते.' असे ट्विट केले आहे. रोहितनेही त्याच्या या ट्विटला रिप्लाय देत त्याला येणारी अडचण सुधारवण्याचा प्रयत्न केला आहे. 'काळजी करू नकोस, जर गोलंदाजाने शॉर्ट चेंडू टाकला तर फक्त बॅटने चेंडूला स्लाइस कर. असे रिट्विट करत मुंबई इंडियन्स तुमचे यावर मत काय? असा मजेशीर सवाल उपस्थित केला आहे. रोहितच्या या सवालानंतर मुंबई इंडियन्सनेही लगेच रिप्लाय दिला. त्यांनी रोहितचाच एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्याला मदत केली. रोहित दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Rohit sharma

    पुढील बातम्या