मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोहित शर्माचं IND vs ENG टेस्ट सीरिजबाबत मोठं वक्तव्य, सांगितलं कोण जिंकलं?

रोहित शर्माचं IND vs ENG टेस्ट सीरिजबाबत मोठं वक्तव्य, सांगितलं कोण जिंकलं?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मागच्या महिन्यातली पाचवी आणि अखेरची मॅनचेस्टरमध्ये होणारी टेस्ट (Manchester Test) अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली. आता दोन्ही देशांची क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. पण रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत भाष्यं केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 ऑक्टोबर : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मागच्या महिन्यातली पाचवी आणि अखेरची मॅनचेस्टरमध्ये होणारी टेस्ट (Manchester Test) अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली. टीम इंडियामध्ये कोरोनाचा (Corona Virus Team India) शिरकाव झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर होती, पण पाचवी टेस्ट रद्द झाल्यामुळे सीरिजचा निकाल नेमका काय लागला, याबाबत चर्चा सुरू झाल्या. भारताने टेस्ट खेळायला नकार दिला, त्यामुळे पाचवी टेस्ट इंग्लंडच्या नावावर झाली आणि सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटली, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) सुरुवातीला सांगितलं. पण वाद वाढल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपला हा दावा मागे घेतला. यानंतर आयसीसी (ICC), बीसीसीआय (BCC) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगण्यात आलं.

आता दोन्ही देशांची क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. पण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मते मात्र 5 टेस्ट मॅचची ही सीरिज भारताने जिंकली आहे. एका स्पोर्ट्स वेयर ब्रॅण्डच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा बोलत होता. 'मला असं वाटतं भारतच सीरिजचा विजेता आहे. अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पाचव्या टेस्टचा निकाल काय असेल, ते मला माहिती नाही. आम्ही फक्त उरलेली एक टेस्ट खेळणार का सीरिजचा निर्णय 4 टेस्टच्या आधारावर केला जाणार, याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. मला वाटतं भारताने सीरिज जिंकली आहे,' असं रोहित शर्मा म्हणाला.

टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर भारताने मॅनचेस्टर टेस्ट खेळायला नकार दिला, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. या दौऱ्यात रोहित शर्माने धमाकेदार कामगिरी केली. 4 टेस्टमध्ये 52 पेक्षा जास्तच्या सरासरीने त्याने 368 रन केले, यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. चौथ्या टेस्टमध्ये रोहितने शतक करत भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडमधलं रोहितचं हे पहिलंच टेस्ट शतक होतं. सीरिजमध्ये रोहितपेक्षा जास्त रन इंग्लंडचा कर्णधार जो रूटने केले होते. रूटने 4 टेस्टमध्ये तब्बल 564 रनचा डोंगर उभारला होता.

इंग्लंड दौरा माझ्यासाठी खूप चांगला होता. मी याला बेस्ट मानणार नाही, कारण टेस्ट क्रिकेटमध्ये माझं सर्वोत्तम येणं अजून बाकी आहे. मी या दौऱ्यात ज्याप्रकारे बॅटिंग केली, ते पाहून आनंदी आहे. हा फॉर्म पुढेही कायम ठेवायचा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी यशस्वी व्हायचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

First published:
top videos

    Tags: India vs england, Rohit sharma